इंस्टाग्रामवर मैत्री करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत, त्यानंतर प्रेम जाळ्यात फसवून मुलीवर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती करणाऱ्या वासनांध तरुणाला कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपी अक्षय याची कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीशी इंस्टाग्रामवर मैत्री केली. ही मुलगी जाळ्यात फसल्यानंतर त्याने आपली शिकार बनवली. डिसेंबर २०२१ पासून अक्षय गायकवाड याने या मुलीला आपल्या प्रेमजाळ्यात ओढून तिच्यावर अनेकवेळा शारीरिक अत्याचार केले. यात ही मुलगी सहा महिन्यांची गर्भवती राहिली असल्याची माहिती वैद्यकीय चाचणीनंतर समोर आली आहे. या मुलीच्या जबानीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी अक्षय गायकवाड याला ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी महिला फौजदार एन. के. भोईगड करत असल्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोनि सुनील गवळी यांनी सांगितले.