ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

पाकिस्तानची अवस्था दिवसेंदिवस वाईटाहून वाईटाकडे पीठाचे वाटप,पण ते घेण्यासाठी लोकांमध्ये हाणामारी होताना व्हिडिओ

आर्थिक अवस्था बिकट, पाकिस्तान दिवाळखोरीकडेपाकिस्तानची अवस्था दिवसेंदिवस वाईटाहून वाईटाकडे जात चालली आहे. विविध वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेतच पण आता पीठासाठीही लोक एकमेकांच्या अंगावर धावून जाताना दिसत आहेत.
सरकारच्या माध्यमातून लोकांना पीठाचे वाटप होत आहे, पण ते घेण्यासाठी लोकांमध्ये हाणामारी होताना दिसते आहे. सवलतीच्या दरात हे पीठ उपलब्ध केले जात आहे. व्हीडिओच्या माध्यमातून ही अवस्था आता समोर येऊ लागली आहे. एका व्हीडिओत छोट्या नाल्याच्या बाजुला उभे राहून लोक एकमेकांना आव्हान देत आहेत. त्यात एक माणूस दुसऱ्याला त्या नाल्यात ढकलतो आणि त्यानंतर आणखी एक माणूस तिसऱ्या माणसाला त्याच नाल्यात पाडतो. नाल्यात पडलेल्यांचे कपडे चिखलाने बरबटतात.
दुसऱ्या एका व्हीडिओमध्ये तीन पाकिस्तानी नागरीक पीठाच्या एका पोत्यासाठी भांडताना दिसतात. एका माणसाच्या हातातील पीठाचे पोते हिसकावून घेण्यासाठी त्यांच्यात झटापट सुरू असते. अखेर ते पोते तो खेचून घेण्यात यशस्वी होतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button