संपूर्ण कुटुंब जळून खाक 4 मुलांसह सहा जणांचा मृत्यू

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पानिपतमध्ये (Haryana Panipat) एक भीषण दुर्घटना घडलीये. इथं सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळं पत्नी आणि मुलांसह 6 जण होरपळले आहेत. पानिपतच्या बिचपडी गावात सकाळी सात वाजता हा अपघात झाला. मृतांमध्ये दाम्पत्य, त्यांच्या दोन मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे.
वास्तविक, हरियाणाच्या पानिपतमधील एका गावात सकाळी सात वाजता सिलेंडरचा (Cylinder Explosion) स्फोट झाला, त्यामुळं घराला आग लागली.

आग इतकी भीषण होती की, घरातील सदस्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. या अपघातात संपूर्ण कुटुंब जळून खाक झालं असून 4 मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये दाम्पत्य, त्यांच्या दोन मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे. अब्दुल करीम (50), त्यांची पत्नी अफरोजा (46), मोठी मुलगी इशरत खातून (17), रेश्मा (16), अब्दुल शकूर (10) आणि अफान (7) अशी मृतांची नावं आहेत. दरम्यान, अपघातात बळी पडलेलं कुटुंब मूळचं पश्चिम बंगालचं आहे. या अपघातात संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.