उत्तरप्रदेशमध्ये (Uttar Pradesh) घडलेली घटना आहे. या भीषण अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवार( ६ जानेवारी) रोजी सायंकाळी घडली आहे. यामध्ये केतन नावाचा मुलगा आपल्या मित्रांसोबत क्लाससाठी जात होता. यावेळी शहरातील जवान चौकात एका कारने केतनच्या सायकलला धडक दिली. या धडकेने केतनची सायकल दुर उडून पडली आणि तो स्वतः गाडीच्या मागच्या गार्डमध्ये अडकला.
मात्र कारचालकाने अपघातानंतर कसलीही परवा न करता गाडी तशीच पळवायला सुरूवात केली. रस्त्यावरील लोक, वाहनचालक, अनेकांनी आरडा ओरडा केला, गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. गाडीचा पाठलागही केला मात्र , कार चालकाने गाडी थांबवली नाही.
NEW INDIA means car-dragging incidents or Urinating on Air India flights #AcheDin
Below video is of 15 year old dragged 1 km by a Sanskari car in Hardoi, UP #KanjhawalaDeathCase pic.twitter.com/g12hfnQzCn
— Superman (@superman19239) January 6, 2023
दुसऱ्या चौकात लोकांनी गाडी थांबवून कार चालकाला बाहेर काढत जोरदार मारहाण केली. तसेच त्याची कारही पलटी करण्यात आली. या अपघातात मुलगा केतनच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.त्याचे डोके गाडीच्या वरच्या भागात अडकल्याने कंबरेच्या वरचा भाग सुरक्षित आहे.
मात्र त्याचा पाय तब्बल एक किलोमीटर पर्यंत रस्त्यावर फरफटत नेल्याने गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, चालकाला अटक केली आहे. या घटनेचा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.