ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

तू म्हणशील तिथे येतो. आताच संरक्षण सोडतो. बघुया काय करतो ते! – नारायण राणे


नारायण राणे हे
उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. शिवाय या भेटून संजय राऊत यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. संजय राऊत यांनी उद्देश चांगला नाही. मातोश्रीबद्दल संजय राऊतांची भूमिका योग्य नाही, असं राणे (Narayan Rane) यांचं म्हणणं आहे.उद्धव ठाकरेंना भेटून असं काही मी गोष्टी सांगणार आहे. त्यामुळे संजय राऊत चपलेने मार खाणार, असं नारायण राणे म्हणालेत.

“एक ना एक दिवस मी उद्धव ठाकरेंना भेटणार आहे. मी खासदार झालो तेव्हा संसदेत असताना राज्यसभेत संजय राऊत माझ्या बाजूला येऊन बसायचा. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंबद्दल जे काही सांगायचा ते मी उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे. ते सांगितल्यानंतर रश्मी आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना चपलेने नाही मारलं तर बघा…”, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

भाजप आमदार राम कदम यांच्याकडून काशी यात्रेकरुंसाठी खास सोय करण्यात आली. ही यात्रा मोफत उपलब्ध करून देण्यात आली. त्याला नारायण राणे यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी बोलताना राणे यांनी राऊतांवर प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत मातोश्रीला संपवणारी व्यक्ती आहे. हा मातोश्रीला सुरुंग लावणारा विष आहे. तो ज्याच्या अंगावर हात टाकेल तो खांदा गळालाच समजा, असं राणे म्हणालेत.

संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली असल्याचा आरोपही नारायण राणेंनी केला आहे.

‘ते’ चॅलेंज स्विकारलं!

संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना एकटं फिरण्याचं आव्हान दिलं होतं. ते चॅलेंज राणेंनी स्विकारलं आहे. “तू म्हणशील तिथे येतो. आताच संरक्षण सोडतो. बघुया काय करतो ते!”, असं प्रति आव्हानच नारायण राणे यांनी दिलं आहे. त्यामुळे राणे आणि राऊत यांच्यातील वाद अधिकच वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

नारायण राणे यांच्या या टीकेला संजय राऊत काय उत्तर देणार, हे पाहणं महत्वाचं असेल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button