धक्कादायक अल्पवयीन मुलीने प्रियकरासोबत मिळून आपल्या आईची केली हत्या

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर शहरातून हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका अल्पवयीन मुलीने प्रियकरासोबत मिळून आपल्या आईची हत्या केली.
इतकंच नाही तर हत्येनंतर तिने आईच्या मृतदेहावर चाकूनेही वार केले.

मुलीने हे धक्कादायक कृत्य केलं कारण आईला तिचा प्रियकर पसंत नव्हता. हैराण करणारी बाब म्हणजे मुलीने ज्या प्रियकरासाठी आईची हत्या केली, त्याच्यावर मुलीसोबत रेप आणि अपहरण करण्याचा आरोपही आहे. या आरोपात तो तुरूंगातही गेला होता.

दरम्यान, भिंडची राहणारी एक महिला तिच्या 17 वर्षीय मुलीसोबत हजीरा भागात भाड्याच्या घरात राहत होती. महिलेच्या मुलीवर सोनू नावाच्या तरूणाने तिचं अपहरण करून रेप केला होता. या विरोधात महिला कोर्टात गेली होती. यावर पोलिसांना चौकशीचे आदेश देण्यात आले होते. पोलिसांनी कारवाई करत सोनू विरोधात अपहरण आणि रेपचा गुन्हा दाखल केला होता.

सोनू गेल्या महिन्यातच तुरूंगातून बाहेर आला आणि मुलीसोबत भेटणं सुरू केलं होतं. हे मुलीच्या आईला पसंत नव्हतं. पण मुलगी आईचं काहीच ऐकत नव्हती. ती प्रेमाच्या मार्गात आईला अडथळा समजत होती. यामुळेच तिने शुक्रवारी रात्री आईची हत्या करण्याचा प्लान केला आणि गळा आवळून तिची हत्या केली. हत्या केल्यावर मृतदेहावर चाकूने अनेक वारही केले.

हैराण करणारी बाब म्हणजे मुलगी आणि तिचा प्रियकर रात्रभर मृतदेहासोबत घरातच राहिले. या घटनेचा संशय आल्याने घर मालकाने शनिवारी पोलिसांना हत्येची सूचना दिली.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी बेडखाली ठेवलेला मृतेदह ताब्यात घेतला आणि चौकशी सुरू केली. यावेळी मुलीने तिचा गुन्हा कबूल केला. सोबतच यात तिला प्रियकराने साथ दिल्याचंही ती म्हणाली. पोलिसांनी दोघांना अटक केली.