ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

नशीब कधी कोणाचे उघडेल एका रात्रीत 1 कोटी रुपये मिळाले


नशीब कधी कोणाचे उघडेल सांगता येत नाही. कधी श्रीमंत असणारी गरीब होऊन जातात, तर कधी गरीब असणारे अचानक कोट्यधीश होतात. अशीच एक घटना समोर आली आहे. एका तरुणाला एका रात्रीत 1 कोटी रुपये मिळाले आहेत.
घटना बिहारमधील आहे. येथील एक तरुण एका रात्रीत करोडपती झाला आहे, याचा आनंद त्याच्या घरच्यांना झाला आहे.ही घटना बिहार येथील नवादा जिल्ह्यातील अकबरपूर येथील आहे, येथील एका तरुणाला ड्रीम 11 वर क्रिकेट खेळून त्याला 1 कोटी रुपये मिळाले आहेत.
नवादा जिल्ह्यातील अकबरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पिपरा खुर्द गावातील राजू राम याने ड्रीम 11 मध्ये एक कोटींची रक्कम जिंकली आहे. राजू आपल्या गावात डीजेचे काम करतो आणि एक छोटेसे दुकानही चालवतो. पण रातोरात त्याचे नशीब पालटले आणि आता तो एक कोटीचा मालक झाला आहे.

ड्रीम 11 प्लेइंग अॅपमध्ये गेल्या दीड वर्षांपासून हा गेम खेळत होतो. या गेममध्ये त्याने आधीच सुमारे 85,000 रुपये गुंतवले होते. वेळोवेळी तो कमी प्रमाणात जिंकत होता, पण नशिबाने त्याला साथ दिली आणि त्याने गेम टॅली बोर्डमध्ये प्रथम क्रमांक मिळवून एक कोटी रुपये जिंकले. ज्यावेळी तो हा गेम खेळत होता, त्यावेळी जवळपास 35 लाख लोक एकाच वेळी तो गेम खेळत होते. त्याने ब्रिस्बेन हीट आणि सिडनी थंडर संघातील खेळाडूंची निवड करून संघ बनवला आणि जिंकून एक कोटी जिंकले.

रक्कम जिंकल्यानंतर त्याचा आणि त्याच्या कुटुंबीयांचा यावर अजिबात विश्वास बसत नव्हता. मात्र त्याची विजयी रक्कम खात्यावर जमा होताच सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद झाला. तो डीजेचा छोटासा व्यवसाय करतो आणि आता जिंकलेल्या पैशातून तो आपला व्यवसाय वाढवणार आहे. सध्या कराची रक्कम वजा करून राजूला 70 लाखांची रक्कम जमा झाली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button