ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

मोर केवळ सुंदरच नव्हे तर अतिशय शूरही असतात व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल


मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे, ज्याच्या सौंदर्याचे जगभरात कौतुक केले जाते. मात्र, मोर केवळ सुंदरच नव्हे तर अतिशय शूरही असतात. त्याच्या शौर्याशी संबंधित एक जबरदस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.मात्र, हा व्हिडिओ कधी आणि कुठे चित्रित करण्यात आला आहे, याची पुष्टी झालेली नाही. पण व्हिडीओमध्ये असं पाहायला मिळत आहे की, जेव्हा एखादी महिला मोराची अंडी चोरण्याचा प्रयत्न करते तेव्हा तो डब्ल्यूडब्ल्यूईच्या भांडणाप्रमाणे महिलेला मारून जमिनीवर फेकते.

ही क्लिप 17 सेकंदांची असून, यामध्ये एक मोर अनेक अंड्यांजवळ बसलेला दिसत आहे. इतक्यात एक स्त्री त्याच्या जवळ पोहोचते आणि त्याला उचलून पुढे फेकते. यानंतर ती जमिनीवर विखुरलेली सगळी अंडी गोळा करायला सुरुवात करते. काही सेकंदानंतर मोर उडत उडत येतो आणि त्या स्त्रीला अशा प्रकारे मारतो की ती दूर पडते.

मोराने महिलेला धडा शिकवल्याचा हा व्हिडिओ मंगळवारी @issawooo ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या क्लिपला 12 लाख व्ह्यूज, 90.6 हजार लाईक्स, 16.4 हजार रिट्वीट आणि 3 हजारांहून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत.
एकीकडे हा व्हिडिओ पाहून अनेक युजर्सना हसू आवरत नाही, तर दुसरीकडे युझर्सही मोराच्या या धाडसाला सलाम करत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button