‘लिव्ह इन’ मधील नखरे…… त्याला उठवायला गेली आणि मार खाऊन आली.

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पुणेः मोठ्या शहरांमध्ये लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांचं प्रमाण वाढलं आहे. या जोडप्यांमधले वादही टोकाचे असतात. पुण्यात एका प्रकरणात पार्टनरला झोपोतून उठवायाल गेलेल्या तरुणीला मार खावा लागला आहे.आता हे प्रकरण थेट पोलिस ठाण्यातमध्ये पोहोचलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्कमध्ये एका उच्चभ्रू सोसायटीत ३४ वर्षाची तरुणी आणि ३८ वर्षाचा तरुण राहतात. विशेषतः हे दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. एकाच कंपनीमध्ये काम करत असताना त्यांची ओळख झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मागील १ वर्षांपासून ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.१९ डिसेंबर रोजी सायंकाळी फिर्यादी तरुणी ही तिच्या जोडीदार जो गाढ झोपेत होता त्याला उठवण्यासाठी गेली. मात्र तो झोपेतून उठण्यास मनाई करत होता. तरुणीने पुन्हा एकदा जबरदस्तीने त्याला उठवायला प्रयत्न केला. यावेळी त्या तरुणाला राग आला आणि त्याने तिला मारहाण केली.मारहाणीनंतर तरुणीने थेट पोलीस स्टेशन गाठले आणि जोडीदाराविरोधात तक्रार दिली. पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणाचा पुढीत तपास पोलिस करीत आहेत.