आपल्याकडे उंदीर येत असल्याचं लक्षात येताच चक्क मांजराने धूम ठोकली व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर तर काही थक्क करणारे असतात. तसं पाहता उंदीर आणि मांजराचं वैर काही नवीन नाही.
आजवर तुम्ही मांजराला पाहताच उंदराने धूम ठोकल्याचं बघितलं असेल. पण कधी उंदीर बघून मांजरानेच धूम ठोकल्याचं बघितलंय का…? नाही ना…? सोशल मीडियावर असाच एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे.

व्हिडीओत चक्क एका उंदराला बघून मांजरानेच धूम ठोकल्याचं दिसत आहे. यावर विश्वास ठेवणं कठीण आहे पण हे खरंच. आपल्याकडे उंदीर येत असल्याचं लक्षात येताच चक्क मांजराने धूम ठोकली आहे. उंदीर आणि मांजराचा हा मजेशीर (Funny Video) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, मांजर एका मोकळ्या जागेत उभं असल्याचं दिसत आहे. अचानक एक उंदीर या मांजराकडे येतो. शिकार आपल्याकडे स्वत:हून चालत येत असल्याचं बघून मांजराचा तोरा वाढतो. मांजर या उंदरावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न करते.
मात्र, आपला जीव वाचवण्यासाठी हा उंदीर क्षणात रौद्ररुप धारण करतो आणि मांजरावर हल्ला चढवतो. उंदीर आपल्यावर हल्ला करत असल्याचं लक्षात येताच मांजर या उंदरापासून दूर पळून जाताना दिसत आहे.

उंदीर आणि मांजराच्या लढाईचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ @ViralHog ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत व्हिडीओला लाखो लोकांनी बघितलं