ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

दोन ट्रकची एका मागून एक धडक दोन्ही ट्रकनी घेतला पेट


हातखंबा : मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा दर्ग्याजवळ साखरेची पोती भरलेल्या दोन ट्रकने अचानक पेट घेतला. यामुळे परिसरात घबराट पसरली. सांगोल्याहून जयगडच्या दिशेने जाणाऱ्या दोन ट्रकची एका मागून एक धडक झाली.
या अपघातात ट्रक पलटी होऊन दोन्ही ट्रकनी पेट घेतला. यामुळे हातखंबा येथील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.



सुदैवाने दोन्ही ट्रकचे चालक सुखरूप बाहेर पडले आहेत. तात्काळ जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची रुग्णवाहिका देखील घटनास्थळी पोहोचली. रत्नागिरी येथील नगरपालिकेच्या अग्निशमक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचून आग विजवण्याचे काम सुरू केले


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button