ताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

नेकनुर स्त्री रूग्णालयातील बंद केलेली महात्मा ज्योतीराव फुले योजना पुर्ववत सुरू करण्यासाठी जिल्हारूग्णालयात ठिय्या आंदोलन ; डाॅ.सुरेश साबळे यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर


नेकनुर स्त्री रूग्णालयातील बंद केलेली महात्मा ज्योतीराव फुले योजना पुर्ववत सुरू करण्यासाठी जिल्हारूग्णालयात ठिय्या आंदोलन ; डाॅ.सुरेश साबळे यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
___
बीड तालुक्यातील नेकनुर येथील बंद केलेली महात्मा ज्योतीराव फुले जन योजना व आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना(MJPJAY &MPJAY ) चुकीच्या माहितीच्या आधारे अन्यायकारक रित्या बंद करण्यात आली असून ती पुर्ववत सुरू करण्यात यावी यासाठी आंदोलनाचा ईशारा सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हारूग्णालय बीड येथे ठीय्या आंदोलन सुरू करण्यात आले असून आंदोलनात सहभागी असुन शेख युनुस च-हाटकर, बलभीम उबाळे सय्यद आबेद बीडकर,शेख मुबीन,शेख मुश्ताक आणि मुक्त पत्रकार संतोष ढाकणे आदि सहभागी झाले होते.मागण्यांचे निवेदन डाॅ.सुरेश साबळं जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड यांना देण्यात आले.



सविस्तर माहीतीस्तव
__
नेकनुर ता.जि.बीड येथील स्त्री रूग्णालय बालाघाटावरील गोरगरीब रूग्णांसाठी आरोग्यसुविधेचे वरदान असून महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत (MJPJAY & PMJAY) लाभ मिळत होता मात्र दि.१८ ऑक्टोबर २०२२ रोजी पासुन CMO mumbai डाॅ.सुशांत पटवर्धन यांनी संपूर्णपणे शहानिशा न करताच केवळ गैरसमजातून या योजनेंतर्गत लाभ बंद करण्यात आलेला आहे.
डाॅ.सुशांत पटवर्धन यांनी नेकनुर स्त्री रूग्णालय येथील महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभ बंद केल्यानंतर डाॅ.आशिलाक शिंदे वैद्यकीय अधिक्षक स्त्री रूग्णालय नेकनुर यांनी संबधित प्रकरणात खुलासा सादर केलेला आहे तसेच याविषयी दि.७ नोव्हेंबर आणि दि.२१ नोव्हेंबर रोजी उपसंचालक आरोग्य सेवा लातूर तसेच जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड यांना लेखी पत्रव्यवहार करून योजना पुर्ववत सुरू करण्यात यावी यासाठी विनंती केलेली असून त्याची दखल घेतल्याचे दिसून येत नाही.
अहमदपूर-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील नेकनुर मोठी बाजारपेठ असून बालाघाटावरील ४०-५०,गावातील लोकांना नेकनुर येथील स्त्री रूग्णालयाचा आधार असुन बीडला जिल्हारूग्णालयात जाण्यासाठी २५ किलोमीटर अंतर जावे लागत आहे. त्यामुळेच गोरगरीब रूग्णांची गैरसोय होत आहे.

डाॅ.सुरेश साबळे यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
___
डाॅ.सुरेश साबळे यांनी मागण्यांसंदर्भात वरीष्ठांना लेखी कळवण्यात आल्या असुन मागण्या लवकरात लवकर पुर्ण करण्यात येऊन सदरील रूग्णालयाच्या सर्व लाभार्थ्यांना (MJPJAY & PMJAY) या योजनेंतर्गत येणा-या सर्व सुविधा पुर्ववत सुरू करण्यात येतील या लेखी आश्वासनानंतर ठीय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button