7.1 C
New York
Saturday, December 9, 2023

Buy now

रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न

spot_img

रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न

 कल्याण : तमाम संघटित असंघटित कामगार- कर्मचारी – अधिकारी यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिखर संघटना रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे राज्यस्तरीय अधिवेशन ( केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, भारत सरकार ) ना. डॉ. रामदासजी आठवले यांच्या अध्यक्षतेने आचार्य प्रल्हाद केशव अत्रे , रंगमंदिर, कल्याण (प.) जिल्हा – ठाणे येथे मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात संपन्न झाले .
यावेळी बोलताना . ना . डॉ. रामदासजी आठवले म्हणाले, “एम्प्लॉईजचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी आवाज उठवण्याचे काम चालू आहे. कुणाची बदली होते , कोणाला सस्पेंड करतात, कोणाला प्रमोशन मिळत नाही. आशा पद्धतीचे प्रश्न असतात. अधिकाऱ्यांना पत्र देतो. अनेक अधिकाऱ्यांना फोन करतो. अनेकांना न्याय मिळतो अनेकांचे प्रश्न आपल्यामाध्यमातून सुटतात. रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने अनेक ठराव करण्यात आले आहेत. त्या ठरावाची अंमलबजावणी राज्यसरकार केंद्रासरकारने करावी आशा पद्धतीची मागणी त्यामध्ये करण्यात आली आहे. एम्प्लॉईजवर जे अन्याय होतात ते अन्याय होता काम नये. मागासवर्गीयांना पुढील प्रमोशन मिळावे. आशा प्रकारची मागणी ठरावात आहे. हा विषय मार्गी लावायचा आहे.”

यावेळी ( केंद्रीय सरचिटणीस रि. ए. फेडरेशनचे नेते ) आत्माराम पाखरे म्हणाले, “अधिवेशनात घेण्यात आलेल्या विविध मागण्या आणि ठराव यांचे करिता शासनाकडे पाठ पुरावा करण्यात येईल”

यावेळी ( रि.ए. फेडरेशन ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख नेते ) संजय थोरात म्हणाले, “सेवाभर्तीचे प्रश्न व शिक्षण विभागातील प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्रभर संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न सहकाऱ्यांन सोबत करण्यात येईल. अधिकारी कर्मचारी यांच्यावर अन्याय झाल्यास त्यांनी संघटनेकडे संपर्क करावा . त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी संघटना वचनबद्ध आहे.”

यावेळी ( केंद्रीय सरचिटणीस रि. ए. फेडरेशन ) आत्माराम पाखरे , ( राष्ट्रीय उपाध्यक्ष रिपाई महाराष्ट्र प्रदेश) सुरेश बारशिंगे , रिपाई जेष्ठ नेते अण्णा रोकडे , ( कल्याण – डोंबिवली जिल्हा अध्यक्ष रिपाई) प्रल्हाद जाधव , (उपाध्यक्ष जिल्हा परिषद ठाणे ) सुभाष पवार, (एबीएम समाज प्रबोधन संस्थेचे संस्थापक ) सीताराम गायकवाड , (आरपीआयचे राष्ट्रीय सचिव) दयाल बहादूरे , (रि.ए. फेडरेशन कोषाध्यक्ष) सिद्धार्थ रणपिसे , महाराष्ट्र कार्यकारणी आणि ठाणे जिल्हा कार्यकारनिवरील आरपीआयचे पदाधिकारी इत्यादी सह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून
जिल्हा , तालुका आणि विविध विभागातील कर्मचारी अधिकारी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन ठाणे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले होते . अधिवेशन यशस्वी करण्यासाठी ( रि.ए. फेडरेशन ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख नेते ) संजय थोरात, ( रि.ए. फेडरेशन ठाणे जिल्हा नेते ) भगवान पवार , (रि.ए. फेडरेशन ठाणे जिल्हा अध्यक्ष ) दादासाहेब शिंदे, ( रि.ए. फेडरेशन ठाणे जिल्हा सरचिटणीस ) गौतम रातांबे , ( रि.ए. फेडरेशन ठाणे जिल्हा संघटक ) नवनाथ रणखांबे, इत्यादी. यांनी मेहनत घेतली
यावेळी ठाणे जिल्ह्यातील प्रभावी सामाजिक काम करणाऱ्या सीताराम गायकवाड , मेहबूब पैठणकर, ताराबाई घायवट, त्याच प्रमाणे महासचिव रि. ए. फेडरेशन आत्माराम पाखरे , एल आर गायकवाड इ. यांचा सत्कार ना. रामदासजी आठवले यांच्या हस्ते करण्यात आला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles