पतीने रागाच्या भरात पत्नीला अत्यंत क्रूर पद्धतीने मारत शिर धडावेगळे

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


डिसेंबर : मागच्या काही दिवसांपूर्वी प्रेयसीचे शिर धडावेगळे करून 35 तुकडे केल्याची घटना देशभरात गाजत आहे. यामुळे अशा घटना होत असल्याचे समोर आल्याने लोकांची मानसिकता क्रुरतेकडे चालली आहे का?
असा प्रश्न सर्वांना पडत आहे. दरम्यान ही घटना ताजी असताना पुन्हा एक अशाच मानसिकतेची घटना परभणी जिल्ह्यात घडल्याने खळबळ माजली आहे. पतीने रागाच्या भरात पत्नीला अत्यंत क्रूर पद्धतीने मारत शिर धडावेगळे केले आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

परभणी जिल्ह्यातील कमलापूर (ता.पुर्णा) येथील पतीने कोयत्याने पत्नीचा चेहरा विद्रुप करुन शिर धडावेगळे केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पोलिसांना समजताच घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केले आहे. या घटनेमुळे कमलापूर परिसरात खळबळ उडाली असून घटनेचे कारण अस्पष्ट आहे. दरम्यान कोणतेही कारण नसताना असे कृत्य केल्याने याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कमलापूर येथे केशव गोविंदराव मोरे (वय 43) व त्यांची पत्नी आशाबाई (वय 37) राहत होते.

मोरे दाम्‍पत्‍याला 2 मुली व एक मुलगा आहे. मंगळवार (दि.29) रात्री 10 च्या सुमारास केशव मोरे हा हातात धारधार शस्त्र हातात घेऊन आला. त्‍याने पत्नी आशावर यांच्या चेहऱ्यावर वार करून चेहरा विद्रुप करत त्याने शिर धडावेगळे केले.

तो एका हातात धारधार शस्त्र व दुसऱ्या हातात पत्नीचे शिर घेऊन घरासमोर फिरत होता. यामुळे कुंटुबातील नातेवाईकांसह गावात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती ग्रामस्‍थांनी ताडकळस पोलीसांना दिली.

पोलीसांनी तात्‍काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. याप्रकरणी केशव गोविंदराव मोरे याच्‍यावर गुन्हा दाखल झाला आहे.