अधिकाऱ्याच्या पत्नीची सोलापुरातील हॉटेलमध्ये आत्महत्या

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


सोलापूर : सोलापुरातील (Solapur) हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. लातूरमधील (Latur) एका अधिकाऱ्याच्या पत्नीने सोलापुरातील हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे.
स्नेहलता प्रभू जाधव (Snehalata Prabhu Jadhav) असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. स्नेहलता या लातूरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी प्रभू जाधव यांच्या पत्नी होत्या. स्नेहलता यांनी हॉटेलच्या रुममध्ये साडीने गळफास घेऊन आयुष्य संपवलं.

मुलाच्या लग्नाच्या बस्त्याची खरेदी

स्नेहलता प्रभू जाधव यांच्या मुलाचे 18 डिसेंबर रोजी लग्न आहे. लग्नच्या बस्त्याच्या खरेदीसाठी प्रभू जाधव आणि स्नेहलता जाधव हे कर्नाटकातील चडचण (Chadchan Karnataka) येथे गेले होते. शनिवारी रात्री उशीर झाल्याने ते दोघे सोलापुरातील सोरेगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होते. रविवारी सकाळी प्रभू जाधव (Prabhu Jadhav) हे कामानिमीत्त लातूरला गेले.

रडत रडत नातेवाईकाला फोन

दुपारी स्नेहलता यांनी आपल्या लातूरमधील नातेवाईकाला फोन करत जोरजोराने रडत फोन केला. फोन करुन त्यांनी आपण आत्महत्या करणार असे सांगितलं. त्यानंतर त्यांनी हॉटेलमधील रूममध्येच साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. काल रात्री उशिरा सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात त्यांच्या मृतदेहचे शवविच्छेदन झाले.

आत्महत्येचं कारण काय?

स्नेहलता जाधव यांच्या आत्महत्येने लातूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तोंडावर मुलाचं लग्न, त्याच्या खरेदीची तयारी अशी सगळी लगबग सुरु होती. खरेदीसाठी जाधव दाम्पत्य गेलं होतं. मात्र ज्या ठिकाणी खरेदीला गेले, तिथे स्नेहलता जाधव यांनी आत्महत्या केल्याने, नेमकं काय घडलं याचा अंदाज कोणालाही बांधता येत नाही. याप्रकरणी पोलीस आता पुढील तपास करत आहेत.