नांदेड : नांदेड येथील रहिवासी असलेला खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह रिंडा गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे.
रिंडाचा पाकिस्तानात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ड्रग्सच्या अतिसेवनामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे.
नांदेडमध्ये व्यावसायिक संजय बियाणी यांची दिवसाढवळ्या हत्या झाली होती, त्यामागे रिंडाचा हात होता. सिद्धू मुसेवाला यांची हत्या करणाऱ्यांमध्ये रिंडाच्या नेटवर्कमधील काही शुटर्सचा हात होता. तसेच पंजाब इंटेलिजन्स हेड क्वार्टरवरील हल्ल्यातही त्याचा हात होता.
पंजाबमधील अनेक हल्ल्यांसाठी रिंडा जबाबदार होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो पाकिस्तानमध्ये राहत होता आणि भारतात दहशतवादी हल्ल्यांची योजना आखत होता. रिंडाचा पाकिस्तानातील लाहोर येथील रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
रिंडाने 2020 मध्ये पाकिस्तानी एजन्सी ISI च्या मदतीने भारत सोडला होता. तेव्हापासून तो स्लीपर सेलच्या मदतीने पंजाब, हरियाणा, हैदराबाद आणि महाराष्ट्रात स्फोटकांचा पुरवठा करत असल्याचे गुप्तचर विभागानं काही दिवसापूर्वी स्पष्ट केलं होतं.
रिंडावर आतापर्यंत मोक्का, अपहरण आणि खुनाचे गुन्हेही दाखल होते. रिंडा A+ स्तरावरील गुंड म्हणून ओळखला जातो. हरविंदर सिंग रिंडावर आतापर्यंत 37 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी नांदेडमध्ये 14 आणि पंजाबमध्ये 23 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
✍️✍️हे ही वाचा
लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
नवगण न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या