बीड जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतीच्या निवडणुका राष्ट्रवादीचा स्वबळावर लढवण्याचा नारा

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


बीड : बीड जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतीच्या निवडणुका राष्ट्रवादीने स्वबळावर लढवण्याचा नारा दिला आहे. यामुळं बीडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
बीड शहरातील राष्ट्रवादी भवन येथे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात माहिती दिली आहे.

विधानसभा, विधान परिषद आणि लोकसभा या निवडणुका महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) एकत्रित लढवायचे ठरवलं असलं तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं आहे. असं देखील राजेश्वर चव्हाण म्हणाले. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी मध्ये बिघाडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

उद्धव ठाकरे ‘मविआ’तून बाहेर पडणार?

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने देशभरात खळबळ माजली आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील मित्र पक्षांची यामुळे अडचण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा

लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या