ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

झोपेत महिलेच्या तोंडात घुसला साप मग काय झाले? व्हिडिओ पहा!


झोपेत कुणाच्या अंगावर झुरळ आलं, कुणाला उंदीर चावला हे तुम्ही ऐकलं असेल. झोपेत एखाद्याच्या अंथरूणात किंवा अंगावर साप आला इतपतही ठिक आहे. पण तो साप त्या व्यक्तीच्या तोंडातही गेला…. फक्त वाचूनच तुमच्या अंगावर काटा आला असेल. धक्कादायक म्हणजे साप तोंडात गेला तरी त्या व्यक्तीला समजलं नाही. एका महिलेसोबत असं घडलं आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.एक महिला झोपली असताना तिच्या तोंडात साप गेला. तब्बल 4 फूट लांबीचा हा साप. ही महिला इतकी गाढ झोपली होती की साप तिच्या तोंडात घुसला तरी तिला समजलं नाही. जेव्हा समजलं तेव्हा ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी साप तिच्या तोंडातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. व्हिडीओत पाहू शकता महिला झोपली आहे आणि डॉक्टर एका खास स्टिकमार्फत तिच्या तोंडातून साप काढत आहेत. बऱ्याच वेळानंतर कसंबसं त्या सापाला महिलेच्या तोंडातून बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश मिळालं.

व्हिडीओ पाहताना आपल्यालाही अंगावर काटा येतो. सापाला तोंडाबाहेर काढल्यानंतर त्याला पाहून डॉक्टरही घाबरले, त्यांनाही घाम फुटला. साप खूपच लांब होता. हा साप आपल्याला चावेल अशी भीती त्यांना वाटत होती.
सापाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण असा व्हिडीओ तुम्ही याआधी कधीच पाहिला नसावा. हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही.

हे ही वाचा

लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या 

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button