ज्ञानेश्वर फुके व सुशांत गुट्टे यांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल सत्कार

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

 

ज्ञानेश्वर फुके व सुशांत गुट्टे यांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल सत्कार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- मनात जिद्द चिकाटी व अथक परिश्रम करण्याची सकारात्मक मनोवृत्ती असेल तर या जगात काहीच अशक्य नाही परळीतील ज्ञानेश्वर फुके व सुशांत गुट्टे या दोघांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. सुशांत गुट्टे व ज्ञानेश्वर फुके यांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल सत्कार परळीत शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.जिद्द आणि चिकाटी असेल तर यश नक्कीच मिळते असे प्रतिपादन भिवा बिडगर यांनी केले आहे.
शहरातील होळकर चौक येथील ज्ञानेश्वर जगनाथ फुके यांची आसाम रायफल शिपाई या पदावर तर तालुक्यातील दादाहरी वडगाव येथील गुट्टे सुशांत रमेश, टेक्निकल आर्मी शिपाई पदावर निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल शनिवार, दि.12 नोव्हेंबर रोजी परळीत सत्कार करण्यात आला. यावेळी भिवा बिडगर, विकास बिडगर, चंद्रकांत देवकते, व्यकट बिडगर, गोविंद मोहेकर, गणेश देवकते, दीपक कातकडे, पवन बोडके, विलास आव्हाड, अगंद गंगणे, नारायण देवकते, रामेश्वर देवकते, गणेश फुके व आदी उपस्थित होते. तसेच सर्वांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.

हे ही वाचा

लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या