भाजपच्या पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न….

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


समाजाच्या ट्रस्टच्या कार्यक्रमाचा खर्च समाजाच्या व्हॉटस्अॅप ग्रुपवर टाकल्याच्या कारणावरुन भाजपच्या पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न पुण्यात झाला. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शैलेश नारायण बढाई (वय २८, रा, बढाई गल्ली, रविवारी पेठ) असे त्यांचे नाव आहे. शैलेश बढाई हे भाजपच्या कसबा मतदार संघाचे उपाध्यक्ष आणि पुणे बढाई समाज ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. ही घटना रविवार पेठेतील बढाई गल्लीत सोमवारी रात्री घडली.

याबाबत शैलेश बढाई यांनी फरासखाना पोलिस ठाण्याततक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. कमलेश बालाजी बढाई (वय ३५, रा. धायरी) आणि दिनेश बालाजी बढाई (वय ३८, रा. निवृत्तीनगर, वडगाव पठार) अशी संशयितांची नावे आहेत.

आरोपींनी शैलेश यांना पोटावर, छातीत मारहाण करून गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यामागे नेमके कारण आणि कोण सूत्रधार आहे, याची चौकशी करावी, अशी मागणी फिर्यादी बढाई यांनी केली आहे. बढाई हे ट्रस्टमधील व्यवहार पाहतात. समाजाच्या कार्यक्रमाचा खर्च ते व्हॉटस्अँप ग्रुपवर टाकत असतात.
रविवारी ते घराजवळ असताना कमलेश व दिनेश यांनी त्यांना याबाबत जाब विचारला. त्यांनी शिवीगाळ करुन मारहाण केली. दिनेश याने त्यांनी जीवे मागण्याची धमकी दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक काळे अधिक तपास करीत आहेत.

✍️✍️हे ही वाचा

लोकशाही न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !