राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ रुग्णालयात दाखल

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मुंबई : एकीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भुजबळ यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

छगन भुजबळ यांना मागील तीन दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत आहे. त्यामुळेच त्यांना आज मुंबईतील रुग्णालयात दाखल केलं असल्याची माहिती त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी दिली आहे. सध्या भुजबळ यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात गर्दी करू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे विविध कार्यक्रमात मास्क वापरत असल्याचे दिसून येत होते. आज अस्वस्थ वाटू लागल्याने तसेच दिवसांपासून व्हायरल इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. आज संध्याकाळीचं रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचे माहिती आहे.

✍️✍️हे ही वाचा

लोकशाही न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !