क्राईमछत्रपती संभाजीनगरताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

मुलीला जीवे मारण्याची धमकी,तीन नराधमांचा महिलेवर सामूहिक बलात्कार,आरोपी बीड जिल्ह्यातील..


मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद (Aurangabad) शहरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तीन नराधमांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला आहे. औरंगाबादच्या शेंद्रा परिसरात ही संतापजनक घटना घडली.
याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून चिकलठाणा पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल (Crime News) केला आहे. आरोपी हे बीड जिल्ह्यातील असून महिलेवर अत्याचार केल्यानंतर ते पसार झाले आहेत. त्यांच्या शोधात चिकलठाणा पोलिसांनी (Police) विविध पथके रवाना केली आहेत.



पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी मुलीला मारण्याची धमकी देत पीडितेला शेंद्रा परिसरात असलेल्या एका लॉजवर नेले. २ नोव्हेंबर मध्यरात्री १२ वाजेपासून ३ नोव्हेंबर सकाळी ८ वाजेपर्यंत तीन आरोपांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास आरोपींनी महिलेला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली.
घडलेल्या प्रकारानंतर आरोपींच्या तावडीतून महिलेने कशीबशी सुटका करत थेट चिकलठाणा पोलीस स्टेशन गाठलं. आपल्यासोबत घडलेल्या सर्व प्रकार पीडितेने पोलिसांना सांगितला. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून चिकलठाणा पोलिसांनी तीन नराधमांसह एकूण पाच जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

महिलेवर बलात्कार करून आरोपी पसार झाले आहेत. आरोपी हे मूळ बीड जिल्ह्यातील असल्याची माहिती पीडितेने पोलिसांना दिली आहे. गुन्हा दाखल होताच, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके बीडला रवाना झाली आहेत. एका विवाहित महिलेवर बलात्कार झाल्याचे कळताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

✍️✍️हे ही वाचा

लोकशाही न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !

 

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button