मिरचीच्यादरात विक्रमी वाढ आतापर्यंतचा सर्वाधिक दर

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरचीच्यादरात विक्रमी वाढ झाली आहे

ओल्या लाल मिरचीला (Red chilli pepper) आतापर्यंतचा सर्वाधिक दर मिळत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावेळी लाल मिरचीच्या दरात दुप्पट दरवाढ झाली आहे. सध्या लाल मिरचीला सर्वांधिक म्हणजे सहा हजार रुपयापासून 12 हजार रुपयापर्यंतचा दर मिळत आहे. त्यामुळं चटणीचा दर देखील दुप्पट होणार आहे.
सर्वसामान्यांच्या जेवणात महत्वाचा घटक असलेल्या मिरचीच्या दरात मागच्या वर्षाचा दुप्पट दरवाढ झाली आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ असलेल्या नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समिती ओल्या लाल मिरचीला आज पर्यंतच्या सर्वाधिक दर मिळत आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. नंदूरबार जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी नंदूरबार जिल्ह्यात लाखो क्विंटल मिरची विक्रीसाठी दाखल होत असते. यावर्षी आतापर्यंत तीस हजार क्विंटलहून अधिक मिरचीची खरेदी झाली आहे. बाजार समितीत ओल्या मिरचीचे दर सरासरी प्रतिक्विंटल आठ हजारावर गेले आहेत. तर सर्वाधिक दर यंदा 12 हजार रुपये देण्यात आला आहे. दररोज शंभर ते दीडशे वाहनातून हजारो क्विंटल मिरची विक्रीसाठी नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होत आहे. ओल्या लाल मिरचीचा दर अजून वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

✍️✍️हे ही वाचा

लोकशाही न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !