क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

जीवे मारण्याची धमकी 13 वर्षांय मुलीवर बलात्कार मुलगी तीन महिन्यांची गरोदर


उत्तर प्रदेशातील आझमगडमधील तरवन पोलीस स्टेशन हद्दीतील राहणाऱ्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला गर्भधारणा झाल्यानंतर गर्भपाताचे औषध पाजण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आठवीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीला रक्तस्त्राव झाल्याने ही घटना शनिवारी उघडकीस आली.
मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीवर बलात्कार, गर्भपात, धमकावणे आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.ताज्या बातम्या वाचा व जगाशी रहा कनेक्टेड त्यासाठी आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन कराhttps://chat.whatsapp.com/K8XH9v1Lzc68sEVQxNANnp

दरम्यान, विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिस आधिकारी तरवन अनिल सिंह यांनी सांगितले की, तरवन पोलीस स्टेशन हद्दीतील 13 वर्षांची मुलगी एका खाजगी शाळेत आठवीमध्ये शिकते. त्यांच्या गावात राहणाऱ्या नदीमने फुस लावत तिच्यावर बलात्कार केला. तिने प्रतिकार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तेव्हापासून नदीम सतत मुलीवर बलात्कार करत होता. यादरम्यान ती गर्भवती राहिली.

मुलगी तीन महिन्यांची गरोदर आहे. नदीमला गर्भधारणेची माहिती मिळताच त्याने बाजारातून गर्भपाताचे औषध आणून शनिवारी सकाळी विद्यार्थिनीला शाळेत जात असताना पाजले. औषध घेतल्यानंतर मुलगी शाळेत पोहोचली. मुलीला शाळेतच रक्तस्त्राव सुरू झाला. प्रकृती ढासळल्याची माहिती शिक्षकांना कळताच त्यांनी मुलीच्या वडिलांना माहिती दिली.

कुटुंबीयांनी शाळेत धाव घेत मुलीला रुग्णालयात दाखल केले. यासोबतच रविवारी तक्रार देऊन नदीमविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एसओ तरवन यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करून आरोपी नदीमला अटक करण्यात आली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button