माहेरहून वारंवार पैशांची मागणी करीत तिचा शारीरिक व मानसिक छळ

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


रावेर : विवाहितेला घटस्फोट घेण्यासाठी तसेच पतीचे प्रेम संबंध असलेल्या महिलेला २० लाख रूपये देण्यासाठी माहेरहून वारंवार पैशांची मागणी करीत तिचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या सासरच्या सात जणांसह पतीच्या प्रेमिका विरुध्द येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावेर येथील उटखेडा रोडवरील शिक्षक कॉलनीतील २७ वर्षीय रहिवासी विवाहितेने याबाबत तक्रार दिली आहे. विवाहितेचा पती गौरव सोपान पाटील रा. दिघी पुणे, सासरे सोपान भिका पाटील, सासू प्रतिभा सोपान पाटील रा. शेमलदा ता मुक्ताईनगर, नणंद शितल नारायण पाटील, नंदोई नारायण निवृत्ती पाटील रा पिंप्री सौदागर जि पुणे, लहान नणंद स्नेहल मनेश पाटील नंदोई मणेश गोपाळराव पाटील रा सुंदर मोती नगर, सावखेडा शिवार जळगाव, चुलत नणंद मनीषा निलेश पाटील रा मोरगाव ता रावेर व खुशी उपाध्यय रा विमाननगर पुणे यांनी संगनमत करून सासर कडील मंडळीच्या मागणी प्रमाणे तीन लाखांचे स्त्री धन म्हणून सोन्याचे दागिने व सहा लाख रुपये रोख रक्कम दिले होते. तसेच फिर्यादी विवाहितेचा पती गौरव पाटील याचे दुसऱ्या मुलीशी प्रेम संबंध असताना वरील आरोपींनी विवाह घडवून आणला. आरोपींनी विवाहितेस घटस्फोट दे किंवा प्रेम संबंध असलेल्या महिलेला २०लाख रूपये देण्यासाठी माहेरहून रककम घेवून ये अशी मागणी पती सह सासरच्या लोकांनी वारंवार करीत विवाहितेला चपटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच गांजपाट करून शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी विवाहीत महिलेने दिलेल्या फियादीनुसार एकुण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.