ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

लष्करानं केलेल्या वायुहल्ल्यात 80 नागरिकांचा बळी,आतापर्यंत 2,300 हून अधिक नागरिकांच्या हत्या


सरकारनंही विरोध करणाऱ्यांविरोधात हिंसाचाराचा अवलंब केला आहे. लष्करानं देशाची सत्ता हाती घेतल्यापासून आतापर्यंत 2,300 हून अधिक नागरिकांच्या हत्या केल्या आहेत, तर 15 हजारांहून अधिक लोकांना कारागृहात डांबण्यात आलं आहे. काचिन या समाजघटकानं गेल्या सहा दशकांहून अधिक काळापासून स्वातंत्र्याची चवळव हाती घेतली आहे. या चळवळीच्या 62 व्या प्रारंभदिनानिमित्त या संगीतसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेसाठी अनुमती देण्यात आली होती, असा आयोजकांचा दावा आहे. सरकारनं अद्याप या संपूर्ण घटनेवर भाष्य केलेलं नाहीय.बँकॉक :म्यानमारमधील वांशिक अल्पसंख्याक वाद जोरदार उफाळून आलाय.

भारताचा शेजारी असलेल्या म्यानमार देशात लष्करानं (Myanmar Army) केलेल्या वायुहल्ल्यात (Air Strike) 80 नागरिकांचा बळी गेलाय. हे नागरिक एका संगीतसभेला उपस्थित होते. ही संगीत सभा फुटीरवादी काचिन गटानं आयोजित केली होती, अशी माहिती देण्यात आलीय.

हा हल्ला हेतूपुरस्कर केल्या असल्याचा आरोप या गटानं केलाय. या हल्ल्याबाबत काचिन आर्ट्स असोसिएशनच्या (Kachin Arts Association) प्रवक्त्यानं सांगितलं की, रविवारी-सोमवार झालेल्या हवाई हल्ल्यात 80 लोकं ठार झाली आहेत. तर, 100 हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. म्यानमार देशातील हिंसाचारावर चर्चा करण्यासाठी अग्नेय अशियातील देशांच्या विदेश व्यवहार मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीपूर्वी 3 दिवस हा हल्ला सोमवारी करण्यात आला. या हल्ल्यात मृत झालेल्यांची संख्या नेमकी किती हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, किमान 80 जण मृत्यूमुखी पडले असावेत, असा अंदाज आहे.
गेल्या वर्षी फेब्रुवारीत या देशाचा ताबा तेथील लष्करानं घेतल्यानंतरचा हा सर्वात मोठा लष्करी हल्ला असून मृतांची संख्याही एका दिवसातील सर्वाधिक आहे. अद्याप या हल्ल्याची सविस्तर माहिती देण्यात आलेली नाहीय. संगीत सभेच्या स्थानी या हल्ल्यामुळं प्रचंड नासधूस झाली असून अनेक नागरिकांनी या स्थानाची व्हिडिओग्राफी पोस्ट केली आहे. म्यानमार देशातील अनेक अल्पसंख्य समुदाय स्वायत्ततेची मागणी करीत आहेत. पण, गेल्यावर्षी या देशाचं सरकार उलथवून लष्करानं देशाचा ताबा घेतल्यानंतर या लष्करशाहीला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button