सामाजिक कार्यकर्त्यांच्या कुटुंबावरील भ्याड हल्लाचा निषेध ;लोकप्रतिनिधी धनदांडग्यांनी कायदा हातात घेऊ नये – डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

सामाजिक कार्यकर्त्यांच्या कुटुंबावरील भ्याड हल्लाचा निषेध ;लोकप्रतिनिधी धनदांडग्यांनी कायदा हातात घेऊ नये:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
___
सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड यांच्या कुटुंबियावर धनदांडग्यांनी गुंडामार्फत कायदा हातात घेऊन बेकायदेशीर रित्या मालकी ताब्यातील जागेवर कब्जा करून कुटुंबीयांवर हल्ले करून शारीरिक व मानसिक त्रास देण्याच्या घटनेचा भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत असून असे हल्ले सहन केले जाणार नाहीत. संबधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ईमेल द्वारे मुख्यमंत्री, गृहमंत्री,विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र औरंगाबाद,पोलीस अधीक्षक,अप्पर पोलीस अधीक्षक बीड यांना करण्यात आली आहे.

पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक बीड यांची प्रत्यक्ष भेटून न्यायाची मागणी
___
सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड यांनी शनिमंदिर परीसरातील देवस्थान जमिन संदर्भात दिर्घ न्यायालयीन लढा दिला असून त्याप्रकरणात दुखावले गेलेले व त्यांचे आप्तेष्ट,शुभचिंतक रामनाथ खोड यांच्यावर वैयक्तिक दोषारोपन करत मोंढा परीसरातील त्यांच्या मालकी ताब्यातील जागेवर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना बेकायदेशीर रित्या कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करत असून लोकप्रतिनिधी व धनदांडग्या व्यक्तींकडून मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न करत असून संबधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागमी प्रत्यक्ष पोलीस अधिक्षक बीड नंदकुमार ठाकुर आणि अप्पर पोलीस अधीक्षक बीड सुनिल लांजेवार यांची भेट घेऊन न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली असून न्यायालयाच्या आदेशाचे दोघांनीही पालन करावे परंतु बेकायदेशीर रित्या दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास संबधितांवर पोलीस प्रशासनाने कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी विनंती करण्यात आली.

रामनाथ खोड यांच्या वृद्ध आई व बहिणीस मारहाण प्रकरणात महिला आयोग अध्यक्ष यांना तक्रार
___
सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड यांच्या वयोवृद्ध आई व बहिणीस मारहाण करणा-या संबधितांवर तसेच सुत्रधारांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी रूपालीताई चाकणकर अध्यक्ष महिला आयोग महाराष्ट्र राज्य यांना तक्रार करण्यात आली आहे.

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२