लग्नाचे आमिष,इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध पीडितेची फसवणूक

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


लग्नाचे (Dehuroad) आमिष दाखवून 23 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीवर देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2020 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत घडला आहे.

देहुरोड पोलीस ठाण्यात 23 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली असून अभिजीत विश्वास पाटील (रा. देहुगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष (Dehuroad) दाखवले पीडितेवर वेळोवेळी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापीत केले.लग्न न करता पीडितेची फसवणूक केली. यावरून देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.