महाविकास आघाडीचे काम जनतेपर्यंत पोहचवा – सुप्रिया सुळे

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पौड : देश आणि राज्यापुढे आज अनेक मोठे प्रश्न उभे आहेत. बेरोजगारी आणि महागाईने कळस गाठला आहे. अशा स्थितीत सत्ताधार्‍यांनी ओरबडून सत्ता घेतली. महाविकास आघाडीचे काम जनतेपर्यंत पोहचवा, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी चाले (ता.मुळशी) येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकत्र्यांचा मेळावा नुकताच झाला. या वेळी मार्गदर्शन करताना खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. या वेळी राजाभाऊ हगवणे, सविता दगडे, रणजित शिवतरे, सुनील चांदेरे, महादेव कोंढरे, कालिदास गोपालघरे, अमित कंधारे, अंकुश मोरे, कोमल वाशिवले, चंदाताई केदारी, दीपाली कोकरे, निकिता रानवडे, लहूशेठ चव्हाण तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी खा. सुळे म्हणाल्या की, जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठी आहे.

मुळशी तालुक्यासाठी वेगळ्या प्लॅनची गरज आहे. टाटा कंपनीकडून धरण भागात अन्याय होत असून याविरोधात वेळ पडली तर रस्त्यावर उतरू. नवीन पालकमंत्र्यांंनी यात लक्ष घालून टाटाशी बैठक घेऊन सत्तेत बसणार्‍यांनी यापुढे जबाबदारी घेतली पाहिजे. यावेळी सविता दगडे, रणजित शिवतरे, सुनील चांदेरे, महादेव कोंढरे, अमित कंधारे, रवींद्र कंधारे, विठ्ठल पडवळ, कोमल वाशिवले यांची भाषणे झाली. या मेळाव्याचे नियोजन सरपंच चेतन फाले, बबनराव धिडे, दत्तात्रय धिडे, प्रवीण साठे, भाऊ टेमघरे, सुरेश धिडे, संतोष साठे यांनी केले होते.