बेतिया (बिहार) : बिहारमधील बेतिया येथे एका आरोपीने अंधाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली आहे.
ही घटना बेगुसराय गोळीबारासारखी असल्याचे सांगितले जात आहे. ही धक्कादायक घटना योगापट्टी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या डुमरी गावातील असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने 6 लोकांवर गोळ्या झाडल्या आहेत.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, जिल्ह्यातील योगापट्टी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या डुमरी गावात सशस्त्र हल्लेखोरांनी एका घरात घुसून 6 जणांवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात सर्व 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. लक्षणीय बाब म्हणजे परस्पर वैमनस्यातून ही घटना घडली आहे. योगापट्टी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करून पळ काढणाऱ्या एका आरोपीला स्थानिकांनी पकडले होते. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.