ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

टोमॅटो कॅरेट व ट्रॉलीखाली नऊ महिला सापडल्या,तीन महिलांचा मृत्यू


कुरकुंभ : दौंड तालुक्यातील रावणगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील टोमॅटो तोडून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये घरी घेऊन येत असताना ट्रॉली कालव्याच्या वितरिकेत उलटल्याने टोमॅटो कॅरेट व ट्रॉलीखाली नऊ महिला सापडल्या.
दुर्दैवाने यापैकी तीन महिलांचा मृत्यू झाला. चार महिला जखमी झाल्या. दोन महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. ही घटना गुरूवारी (ता. 13) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

रावणगाव येथील शेतकरी बापूराव आटोळे यांच्या शेतातील टोमॅटो तोडून कॅरेट ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये घरी घेऊन येत असताना ट्रॅक्टर ट्रॉली बंगलवस्ती परिसरातून जाणाऱ्या खडकवासला कालव्याच्या वितरिकेमध्ये उलटली. त्यामुळे टोमॅटोने भरलेले कॅरेट व ट्रॉलीखाली पाठीमागे बसलेल्या टोमॅटो तोडण्यासाठी गेलेल्या नऊ महिला सापडल्या. टोमॅटो कॅरेट व ट्रॉलीखाली सापडलेल्या महिलांना काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी इतर ट्रॅक्टर व जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. मात्र अडचणी येत असल्याने महिलांना बाहेर काढण्यास लवकर यश न आल्याने तीन महिलांचा मृत्यू झाला. तर चार महिला जखमी झाल्या. तर दोन महिला किरकोळ जखमी झाल्या.

त्यापैकी सुरेखा बाळू पानसरे (वय 45), रेश्मा भागूजी पानसरे (वय 38), अश्विनी प्रमोद आटोळे (वय 32) या तीन महिलांचा गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला. तर इंदुबाई बाबासाहेब आटोळे या गंभीर जखमी असून त्यांच्यावर दौंड येथील खासगी रूग्णालयात उपचार चालू आहेत. आणखी तीन जखमी महिलांना भिगवण (ता. इंदापूर) येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोन महिलांनी ट्रॉली उलटत असताना खाली उडी मारल्याने त्या किरकोळ मार लागला आहे. मात्र जखमी असलेल्या पाच महिलांची नावे समजू शकली नाही. अपघाताची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरल्याने गावात शोककळा पसरली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button