ताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

मनसे अमित ठाकरे बीडमध्ये


 

अमित ठाकरे बीडमध्ये

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. मागील आठवड्यातील शुक्रवारी (7 ऑक्टोबर) तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मजबूत करण्यासाठी अमित ठाकरे हे विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. मराठवाडा दौऱ्यात अमित ठाकरे पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात पोहोचले. अमित ठाकरे काल संध्याकाळी परळीमध्ये पोहोचले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. त्यानंतर अमित ठाकरे यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंग दर्शन घेतलं. तर आज कंकालेश्वराचे दर्शन घेतले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. मागील आठवड्यातील शुक्रवारी (7 ऑक्टोबर) तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मजबूत करण्यासाठी अमित ठाकरे हे विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. सध्या बीड दौऱ्यावर असलेलं अमित ठाकरेंनी मोठं वक्तव्य आहे. ते म्हणाले, “मला गर्दी करणारे आणि खोटं बोलणारे कार्यकर्ते नको,” असे त्यांनी म्हटले आहे.

“मी दौरा काढल्यापासून अनेक नवनवीन विद्यार्थी आणि तरुण कार्यकर्ते मनसेमध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहेत. ते मला भेटत आहेत. परंतु गर्दी करणारे आणि खोट बोलणारे कार्यकर्ते मला नको. त्यामुळे मी अनेकांच्या भेटी घेत आहे आणि पक्ष वाढीसाठी नवीन तरुणांना देखील संधी दिली जात आहे, असं म्हणाले. ते बीडमध्ये (Beed) बोलत होते.

याआधी ११ ऑक्टोबर रोजी त्यांनी परभणीतील फर्न हॉटेलच्या सभागृहात महाविद्यालयीन तरुणांशी संवाद साधला. “मुंबईत राहून तुमचे प्रश्न कळणार नाहीत. त्यामुळेच मी इथे तुमचे प्रश्न ऐकण्यासाठी आलो आहे. पुढच्या काळात एक मोठी युवा शक्ती आपल्याला उभी करायची असून त्यासाठी सर्वांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेसोबत यावे, असं आवाहन अमित ठाकरे यांनी यावेळी केलं.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button