पोल्ट्री फॉर्ममध्ये मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत
![](https://lokshahinews24.com/wp-content/uploads/2022/10/Screenshot_20221012_110648-1.jpg)
सातारा : सातारा तालुक्यातील बोरखळ गावच्या सरपंचांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे अमोल नथुराम नलावडे असे या तरुण सारपंचाचे नाव आहे.
मिळालेली अधिकची माहिती असे की अमोल नलावडे हे बोरखळ गावचे सरपंच त्यांचा पोल्ट्रीफॉर्म चा व्यवसाय गावापासून जवळच जरंडेश्वर रोडवर त्यांचा पोल्ट्रीफॉर्म आहे. आज दि 11 ऑक्टोबर रोजी साधारण 12 ते 1 च्या सुमारास वडील नथुराम नलावडे हे पोल्ट्रीफॉर्म कडे गेले असत्या पोल्ट्री फॉर्ममध्ये मुलगा अमोल नलावडे हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला
याबाबत त्यांनी गावकऱ्यांना सांगितले असता नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली दुपारी साधारण दोन वाजता पोलिसांनी शव उत्तरीय तपासणीसाठी सातारा जिल्हा रुग्णालय येथे दाखल केले.
अमोल नलावडे हे अत्यंत हुशार आणि कर्तबगार सरपंच म्हणून परिसरात परिचयाचे होते त्यांनी आपला व्यवसाय आणि नावाचा ठसा उमटविला होता त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत परिसरात चर्चा सुरू असून नेमके कारण अद्यापही समोर आलेले नाही याबाबत सातारा तालुका पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहे.