ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

महंत करशनदास हे एक प्रसिद्ध भविष्यवक्ता 2023-24 मध्ये ‘उपासमार’ येण्याची भविष्यवाणी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी राजकोटमधील जमकंदोराना येथे एका जनसभेला संबोधित केले.
दौऱ्यात पीएम मोदींनी महंत करशनदास बापू यांचीही भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. याचे फोटोही भारतीय जनता पक्षाकडून शेअर करण्यात आले. एवढेच नाही, तर पीएम मोदींनीही करशनदास बापू यांच्या भेटीचा उल्लेख आपल्या सभेतही करत, आपण बापूंचा आशीर्वाद घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

महंत करशनदास हे एक प्रसिद्ध भविष्यवक्ता आहेत. कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर, त्यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात त्यांनी 2020 मध्ये विषाणूजन्य आजारामुळे कोट्यवधी लोकांच्या मृत्यू होईल, अशी भविष्यवाणी केली होती. यानंतर त्यांनी नुकतीच 2023-24 मध्ये ‘उपासमार’ येण्याची भविष्यवाणीही केली आहे. महत्वाचे म्हणजे त्यांनी हे टाळण्याचा मार्गही सांगितला आहे.

2023-24 मध्ये उपासमारीची भविष्यवाणी – बाजरी वाचवणार जीव –

नुकताच करशनदास बापू यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे,या व्हिडिओमध्ये ते 2023-24 मध्ये जगात उपासमारी येण्यासंदर्भात भविष्यवाणी करताना दिसत आहेत. एवढेच नाही, तर यापासून वाचण्यासाठी ते लोकांना ज्वारी आणि बाजरी पेरण्याचा सल्ला देतानाही दिसत आहेत. एवढेच नाही, तर, आपल्याकडे बाजरी असेल, तर आपण पाण्यानेही जिवंत राहू शकता. तसेच, उपासमारीमुळे जगभरात मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Back to top button