क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

प्रेमसंबंधात अडचण ठरणाऱ्या आपल्या सख्ख्या बहिणीचा खून


अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणीने प्रेमसंबंधात अडचण ठरणाऱ्या आपल्या सख्ख्या बहिणीचा खून केला आहे.
तसा आरोप केला जातोय. यापूर्वी येथील अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली होती. मात्र ही आत्महत्या नसून या मुलीच्या सख्ख्या बहिणीनेच तिला संपवल्याचे म्हटले जात आहे. प्रेम प्रकरण उघड होऊ नये म्हणून आपल्या सख्ख्या बहिणीला गळफास देऊन खून केल्याचा आरोप आरोपी बहिणीवर आहे. या घटनेमुळे कोपरगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत मुलगी (वय १६) ही आपल्या राहत्या घरी लटकलेल्या स्थितीत आढळली. या मुलीने घरातील पलंगाला दोरीच्या साह्याने गळफास घेतला. या घटनेनंतर उलट सुलट चर्चांना उधाण आले होते. परंतु पोलिसांच्या तपासात तिची सख्खी बहिण सृष्टी नवनाथ बनकरनेच या अल्पवयीन मुलीचा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

आरोपी सृष्टीचा प्रियकर (खंडाळा तालुका, वैजापूर) आकाश कांगुने याने तिला मोबाईल घेऊन दिला होता. ही माहिती बहिणीने आपल्या आई-वडिलांना सांगितल्यामुळे आपले प्रेम प्रकरण उघड झाल्याचा राग आरोपी बहिणीला होता. याच कारणामुळे आरोपी सृष्टीने आपल्या बहिणीचा काटा काढला. याबाबत आरोपीच्या आईनेच पोलिसात फिर्याद देऊन आपल्या मुलीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वासुदेव देसले करीत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button