क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

सासूला गुंगीचं औषध देवून दररोज प्रियकरा सोबत रासलीला पतीचे अचानक आगमन नंतर काय?


अचानक पती कोणालाही न सांगता घरी पोहोचला. यावेळी त्याची पत्नी तिच्या प्रियकरासोबत खोलीत होती. त्यानंतर पतीने दोघांना रंगेहाथ पकडलं. पत्नीला प्रियकरासोबत पकडल्यानंतर गावकऱ्यांनी हा विषय पंचायत समोर नेत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र पतीने पंचायतचा निर्णय मान्य करण्यास नकार देत हथुआ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून प्रियकराची तुरुंगात रवानगी केली आहे.बिहारच्या गोपालगंजमध्ये एक पत्नी बंद खोलीत तिच्या प्रियकरासोबत होती. तिचा पती कामासाठी दुसऱ्या राज्यात वास्तव्याला आहे.
पण नेमकं त्याच दिवशी तो घरी परतला आणि आपल्या पत्नीला दुसऱ्यासोबत पाहून त्याला धक्काच बसला. दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पाहून पतीने आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले. यानंतर पतीने लोकांच्या मदतीने प्रियकराला पकडलं आणि त्याला मारहाण केली. दरम्यान, हथुआ पोलीस ठाण्याला याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.

त्यानंतर पतीच्या अर्जावरून पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपीला अटक केली. आरोपी प्रियकराला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ही घटना बुधवारची असल्याचे सांगण्यात येत आहे. पत्नीला प्रियकरासह पकडल्यानंतर पतीने पत्नीसोबत राहण्यास नकार दिला आहे. गावकरी आणि पोलिसांच्या पुढाकाराने महिला आजही सासरच्या घरी आहे.
महिलेचे यावर्षी जानेवारी महिन्यात लग्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. लग्नानंतर पती दिल्ली आणि इतर शहरात जाऊन कुटुंबासाठी काबाडकष्ट करू लागला होता. पण इथं पत्नी मात्र आपल्या प्रियकरासोबत ‘इश्क’ लढवत राहिली. महिलेचे शेजारील गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध होते. पतीच्या गैरहजेरीचा फायदा घेत ती आपल्या वृद्ध सासूला गुंगीचं औषध द्यायची आणि दररोज प्रियकराला भेटत असे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button