ताज्या बातम्यादिल्लीमहत्वाचे

पाकिस्तानची उद्ध्वस्त झालेली अर्थव्यवस्था आता कुत्रे आणि गाढवं वाचवणार


पाकिस्तान सरकारमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वास्तविक पाकिस्तानला सध्या रोख रकमेची समस्या भेडसावत आहे. चीनने पाकिस्तानकडून हे प्राणी विकत घेतल्यास त्यांना काही पैसे मिळतील, ज्यामुळे बुडत चाललेली अर्थव्यवस्था वाचण्यास मदत होईल. चीन पारंपारिक औषधं, जिलेटीनमध्ये गाढवांच्या त्वचेचा वापर करत असल्यामुळेच त्यांना यात अधिक रूची असल्याचं पाकिस्तानी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

 

पाकिस्तानची उद्ध्वस्त झालेली अर्थव्यवस्था आता कुत्रे आणि गाढवं वाचवणार आहे. हे आम्ही म्हणत नाही, पण तिथल्या सरकारची तशी योजना आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी पाकिस्तान सरकार आता चीनला गाढवं आणि कुत्रे पुरवण्याच्या तयारीत आहे.

चीनने पाकिस्तानमधून गाढवं आणि कुत्र्यांची आयात करण्यात रस दाखवला असल्याचे पाकिस्तान सरकारचे म्हणणे आहे. चीन यापूर्वीही पाकिस्तानातून गाढवांची आयात करत आहे. यावेळी चीनने पाकिस्तानकडे कुत्र्यांचीही मागणी केली आहे. कुत्रे, गाढव, वटवाघुळापासून विविध प्रकारच्या प्राण्यांच्या मांसाचं सेवन करण्यासाठी चीन पूर्वीपासूनच कुप्रसिद्ध आहे. गाढवांच्या त्वचेपासून औषधाची निर्मिती केली जात असल्याचंही चीनचं म्हणणं आहे.
चीन मुख्यत्वे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून मांस आयात करत आहे. हे दोन्ही देश चीनच्या जवळ आहेत, त्यामुळे त्यांना स्वस्तात मांस उपलब्ध होते. त्याच वेळी चीन आफ्रिकन देशांतूनही गाढवांची आयात करत आहे. परंतु आता कंगाल होत असलेल्या पाकिस्तानच्या मदतीसाठी चीन पाकिस्तानकडूनच आणखी गाढवं खरेदी करण्याचा विचार करत आहे. त्याचबरोबर चीनला सध्या अफगाणिस्तानातून मांसाची आयात होत नाहीये. लम्पी विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अफगाणिस्तानातून होणारी आयात थांबवण्यात आली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button