क्राईमताज्या बातम्यादेश-विदेश

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला पेटवून दिल्याच्या घटनेने खळबळ


डोंबिवली :डोंबिवलीतील कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला पेटवून दिल्याच्या घटनेने खळबळ माजली आहे.या घटनेत आगीने होरपळलेल्या (Dombivli Fire) दोन मुलींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शनिवारी पत्नीसोबत झालेल्या वादानंतर पतीने घराला आग लावली. पत्नीला पेटवल्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी पतीने रचला अपघाताचा बनाव केला होता,

कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीला पेटवून दिले होते. या घटनेत त्याच्या दोन मुली देखील गंभीर झाल्याची घटना शनिवारी पहाटे भोपर परिसरात घडली होती. गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा रवीवारी मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या दोन मुलींचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या निर्दयी पतीने सुरुवातीला ही घरात आग लागल्याने ही घटना घडल्याचा बनाव रचला होता. मात्र पोलीस तपासात (Police Investigation) हा हत्येचा कट असल्याचे उघड झाले. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात निर्दयी पती प्रसाद पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेत प्रसाद देखील जखमी झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर प्रसादची पत्नी प्रीती मुलगी समीरा व समीक्षा या तिघांचाही मृत्यू झाला आहे,

निर्दयी पती प्रसाद याने आपले कृत्य लपविण्यासाठी घराला आग लागल्याचा बनाव करण्यात आल्याचे उघड झाल्याने या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीसह दोन मुलींना जीवे मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उपचारादरम्यान प्रीतीचा रविवारी तर दोन्ही मुलींचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. डोंबिवली भौपर गावात राहणारे प्रसाद आणि प्रीतीमध्ये कौटुंबिक वाद होते याच वादातून त्याने हे कृत्य केले. याआधी चार वर्षापूर्वी त्याने प्रीतीला मारण्याचा प्रयत्न केला होता .त्यावेळी याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात प्रसाद विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर शनिवारी पुन्हा संधी साधत प्रसादने हे कृत्य केलं निर्दयी प्रसादच्या कृत्यामुळे प्रीतीचा बळी तर गेलाच मात्र 13 वर्षीय समीक्षा आणि 11 वर्षीय समीराचा देखील मृत्यू झाला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button