बाबा पुरुषोत्तमानंद यांनी जिवंत समाधी घेतली,72 तासानंतरही ते सुखरूप बाहेर पुढील वेळेस 84 तासांची समाधी घेणार

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे भू-समाधी घेतलेले बाबा पुरुषोत्तमानंद (Baba Purushottamananda) तीन दिवसानंतर बाहेर आले आहेत. याची माहिती मिळताच त्यांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली.
त्यामुळे येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

बाबा पुरुषोत्तमानंद 30 सप्टेंबरला (शुक्रवार) भू-समाधी घेतली होती. यासाठी जमिनीखाली सात फुटांचा खोल खड्डा खोदण्यात आला होता. रात्री रात्री 10 वाजता बाबा पुरुषोत्तमानंद यांनी जिवंत समाधी घेतली. त्यानंतर हा खड्डा लाकडी फळ्या आणि माती टाकून बंद करण्यात आला. आता तब्बल 72 तासानंतरही ते सुखरूप बाहेर आले आहेत. त्यामुळे भाविकांनी दर्शनसाठी तुफान गर्दी केली आहे.

भू-समाधी घेणापूर्वी बाबा पुरुषोत्तमानंद यांना पोलिसांनी अडवले होते. पोलिसांनी त्यांच्याकडून शपथपत्र लिहून घेतले आणि त्यानंतरच त्यांना भू-समाधी घेण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. शुक्रवारी समाधी घेतल्यानंतर सोमवारी दुपारी साडे अकराच्या सुमारास ते सुखरूप बाहेर आले. बाहेर आल्यानंतर त्यांनी आला पुढील वेळेस 84 तासांची समाधी घेणार असल्याचे सांगितले.

कोण आहेत बाबा पुरुषोत्तमानंद?

भोपाळच्या टीटीनगर इथे अशोक सोनी उर्फ बाबा पुरुषोत्तमानंद राहतात. माता मंदिराजवळ असणाऱ्या माँ भद्रकाली विजयासन दरबाराचे ते संस्थापक आहेत. समाधी घेण्याच्या आधी दहा दिवस बाबांनी अन्न त्याग केला होता. त्याकाळात त्यांनी केवळ फळांचा ज्यूस घेतला, असा दावा त्यांच्या मुलाने केला.

…म्हणून घेतली समाधी

जगाच्या कल्याणासाठी आणि इश्वराच्या जवळ जाण्यासाठी समाधी घेतली. समाधीवेळी भक्त देवाच्या अधिक जवळ जातो, अशी प्रतिक्रिया बाबा पुरुषोत्तमानंद यांनी दिली. तसेच एवढा काळ समाधीस्त राहिल्यानंतरही आपल्याला कमजोरी आली नसल्याचे म्हटले. तसेच याकाळात माँ दुर्गेचा साक्षात्कार झाल्याचेही त्यांनी सांगितले.