अनैतिक संबंधातूनच पतीने पत्नीसह दोन मुलींना जाळून ठार मारले

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


प्रीतीच्या माहेरचे जेव्हा तिच्या घरी प्रसादसोबत चर्चा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी, ‘आम्हाला लवकरात लवकर येथून घेवून चला नाहीतर पप्पा आम्हाला जीवे ठार मारतील’ असे प्रीतीसह तिच्या दोन्ही मुलींनी सांगितले होते. चिमुकल्यांचे हे बोल खरे ठरले असून निर्दयी बापाने पत्नीसह दोन मुलींची हत्या केली आहे.

डोंबिवली : अनैतिक संबंधाच्या वादातून पतीने आपल्या पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळल्याची घटना शनिवारी पहाटे भोपर परिसरात घडली होती.

या दुर्घटनेत आईचा रविवारी तर दोन्ही मुलींचा सोमवारी सकाळी दुर्दैवी अंत झाला आहे. आगीत होरपळलेल्या या माय लेकी मृत्युशी झुंज देत होत्या. परंतू आईनंतर दोन्ही मुलींचा मृत्यु झाल्याने डोंबिवली हळहळळी आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात महिलेच्या भावाच्या तक्रारीवरुन प्रसाद पाटील याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी पहाटेच्या सुमारास पूर्वेतील भोपर गावात एका घराला आग लागून त्यामध्ये एका महिलेसह दोन मुली आणि एक पुरुष होरपळल्याची घटना घडली होती. या आगीत प्रसाद पाटील (वय 40) यांच्यासह त्यांच्या पत्नी प्रिती (वय 35) व मुली समीरा (वय 13) व समीक्षा (वय 11) या होरपळल्या होत्या. घराला आग लागल्याचा बनाव प्रथम करण्यात आला होता. मात्र आता या घटनेला वेगळी कलाटणी मिळाली असून अनैतिक संबंधातूनच पतीने पत्नीसह दोन मुलींना जीवे ठार मारले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यातील प्रितीचा रविवारी तर दोन्ही मुलींचा सोमवारी सकाळी मृत्यु झाला. याप्रकरणी प्रीतीचा भाऊ किशोर पाटील यांनी शनिवारी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रसादविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्रितीचा प्रसाद याच्याशी 2007 साली प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर प्रितीला समीरा व समिक्षा या दोन्ही मुलीच झाल्याने प्रसाद सतत प्रतीची मानसिक व शारीरिक छळ करीत होता. भोपर येथे रहाण्यास आल्यानंतर प्रसादचे सूत दुसऱ्या एका महिलेसोबत जुळले असल्याने तो चार चार दिवस घरी येत नसे. यावरून प्रिती व प्रसाद मध्ये खटके उडू लागले होते. प्रितीने त्याला समजविण्याचा प्रयत्न केला परंतू तो पत्नी व मुलींना मारहाण करत असे. यावरून 2015 साली प्रसादने प्रीती व दोन्ही मुलींना मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात प्रसाद विरोधात गुन्हा दाखल झाला होता व प्रसादला अटक देखील केली होती.

वर्षभरानंतर प्रसादने मुलींच्या भवितव्यासाठी पेण येथील न्यायालायता दोघांच्या संमतीने समझोता करीत पुन्हा एकत्र रहायला सुरुवात केली. काही दिवस प्रसाद चांगला वागला परंतू पुन्हा त्याचे घराबाहेर राहणे, पत्नी मुलींना मारहाण करणे सुरु झाले. ही बाब प्रितीने माहेरी सांगितली होती. सप्टेंबर महिन्यात माहेरची लोक प्रसादला भेटायला भोपर येथे आली होती. त्यावेळी, प्रसादने या सर्वांसोबत भांडण उकरून काढत घरातून जायला भाग पाडल्याचे किशोर यांनी मानपाडा पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.