अत्याचार व विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


नाशिक : पत्नीस अश्लील व्हिडिओ दाखवून अनैसर्गिक अत्याचार करणार्‍या पतीसह माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावणार्‍या सासूविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात अत्याचार व विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार पतीने 18 जुलै 2021 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत अनैसर्गिक अत्याचार केले. त्याचप्रमाणे लग्नात मुलाला सोन्याचे दागिने दिले नाही, असे सांगून माहेरून पैसे आण, असा तगादा सासूने लावला. त्याचप्रमाणे सुनेस जेवणास शिळे अन्न देत मानसिक व शारीरिक छळ केला. त्यामुळे भद्रकाली पोलिस ठाण्यात पीडितेच्या पतीसह सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.