बोगस कामांचा सुळसुळाट जिल्हा परिषद बीड कडून उप अभियंता परळी यांच्या मार्फत चौकशीचे आदेश

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

गेल्या एक ते दीड वर्षात गावात खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची चर्चा गावात होती म्हणून मी त्याची शहानिशा करण्यासाठी गावचे ग्रामसेवक नखाते साहेब यांच्याकडे 18/7/2022 रोजी माहिती अधिकार अर्ज केला होता, या संदर्भात ग्रामसेवक यांनी मला पत्राद्वारे कळविले की आपल्याला हवी असलेली माहिती ग्रामपंचायत कडे उपलब्ध आहे, नंतर मी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मला सांगितले कि अर्धवट माहिती उपलब्ध आहे, पुर्ण माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे॒॒
-तक्रारदार
सुशील नेहरकर

केज : केज- अंबाजोगाई रोड च्या लागत असलेल्या पिसेगाव या गावी बोगस कामांचा सुळसुळाट चालू असल्याचे दिसून येते आहे , काही दिवसांपूर्वीच बोगस रस्ता कामांची तक्रार ताजी असतानाच आता लगेच गावात या आधीच नळजोडणी पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली असून फक्त नाव बदलून पुन्हा नळजोडणी योजना फक्त कागदावरच पुर्ण करुन निधी हडप होऊ नये या साठी प्रत्यक्ष पाहाणी करून या योजनेबाबत पुढील निर्णय घेण्यात यावा अशी तक्रार बीड जिल्हा परिषद ला प्राप्त झाली आहे,
सवीस्तर माहिती अशी कि पिसेगाव या गावी जिल्हा परिषद बीड,सन 2021-2022 अंतर्गत जल जिवन मिशन मधील नळ पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली असून तक्रारदार यांनी तक्रार नमुद केल्यानूसार पिसेगावातील प्रत्येक घरोघरी नळ पाणीपुरवठा योजना हि सन 2018 मध्येच जलशुद्धीकरण केंद्र सोनीजवळा येथून धारुर शहराला होणार्या पाइपलाइन मधून पिसेगाव फाटा ते पिसेगाव तलाव विहिर अशी करण्यात आली आहे,व तलावातील विहिरीतून पुर्ण गावठाण क्षेत्रातील घरोघरी नळजोडणी मार्फत पाणी पुरवठा केला जात आहे. आता मंजूर करण्यात आलेले काम हे फक्त कागदावरच पुर्ण करुन गुत्तेदार, सत्ताधारी पुढारी यांचे खिसे भरून काढण्यासाठी करण्याचा प्रयत्न होऊ शकतो या साठी प्रशासनाने प्रत्यक्ष गावात जाऊन हि योजना गावांसाठी अवश्य आहे का, घरोघरी नळजोडणी आहे का,गावाला जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो का हे पाहणे महत्त्वाचे आहे, तसे जिल्हा परिषद बीड कडून उप अभियंता परळी यांच्या मार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत,