पत्नीचा बॅटने मारहाण करून आणि नंतर गळा दाबून खून

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मुंबई : एका व्यक्तीने आपल्याच पत्नीचा खून केला आहे. गाझियाबाद जिल्ह्यातील मसुरी पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने आपल्या पत्नीचा बॅटने मारहाण करून आणि नंतर गळा दाबून खून केला.
घटनेनंतर आरोपी तरुण त्याच्या कुटुंबीयांसह घटनास्थळावरून फरार झाला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिसलगढी येथील कॅफे ऑपरेटर गौरवचा विवाह नऊ महिन्यांपूर्वी खोडा येथील रहिवासी जयवीर सिंग हिच्यासोबत झाला होता. तो दुसऱ्या मजल्यावर पत्नीसह राहत होता तर तळमजल्यावर दोन भाऊ आणि आई-वडील राहत होते. गौरव व्यसनी असल्याने लग्नानंतर काही महिन्यांपासून दोघांमध्ये हुंड्यावरून वाद झाला. मसुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी रवींद चंद पंत यांनी सांगितले की, रविवारी रात्रीही गौरव आणि टीनामध्ये वाद झाला होता.

सोमवारी पहाटे चार वाजता नशेत असलेल्या गौरवने बेसबॉलच्या बॅटने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. आरडाओरडा होऊनही घरात उपस्थित असलेल्या एकाही सदस्याने वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. टीना बेशुद्ध पडल्यावर त्याने तिचा गळा दाबून खून केला आणि घरातून पळ काढला.

पोलिसांनी गोविंदपुरम येथील उद्यानातून बेशुद्ध अवस्थेत गौरवला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने सांगितले की, त्याचे लग्न नऊ महिन्यांपूर्वी डिसेंबर 2021 मध्ये टीनाशी झाले होते. आपल्या धाकट्या भावाची ती खूप काळजी घेत असल्याने टीनाचे आपल्यावर प्रेम नाही असे त्याला वाटले. त्यामुळे दोघांमध्ये काही तरी आहे असा संशय त्याला आला. मात्र, त्याचा कोणताही पुरावा त्याला सापडला नाही.

टीनापासून त्याला वेगळे व्हायचे आहे. त्यासाठी तो दोन दिवसांपूर्वी घरातून पळून जयपूरला गेला होता. कुटुंबीयांनी तेथे पोहोचून रविवारी त्यांना तेथून घरी आणले. तो रात्रीच आला होता. अशी माहिती घरच्या व्यक्तींनी दिली.

त्याने दारू प्यायली होती. त्याला वाटले की अशा प्रकारे आपण वेगळे होऊ शकणार नाही, म्हणून त्याने तिला मारण्याचा निर्णय घेतला. पहाटे चार वाजता त्यांचे डोळे उघडले. टीना झोपली होती. त्याला उठवून खोलीचा दरवाजा बंद करून मारहाण केली.