महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. ते सुमारे ४० मिनिटं मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या ‘वर्षा’ बंगल्यावर होते. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं होतं. आज राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

काही वेळापूर्वीच राज ठाकरे आपल्या कुटुंबासह मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे होते. याशिवाय मनसे आमदार राजू पाटील, नितीन सरदेसाई हेही असल्याची माहिती मिळत आहे. राज ठाकरे वर्षा बंगल्यावर जवळपास ४० मिनिटं होते. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची जवळीक वाढत असल्याने विविध तर्क वितर्क लावले जात आहेत.

राज्यात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरु असताना नेत्यांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरुच आहे.
मुख्यमंत्री शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं.
त्यानंतर आज राज ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी जाऊन बाप्पांचं दर्शन घेतले.
यावेळी राज ठाकरे यांच्यासह पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे यावेळी उपस्थित होते.
एकीकडे या भेटीची चर्चा सुरु असतानाच आज वर्षा बंगल्यावर शिंदे गट आणि भाजपच्या मंत्री आणि आमदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलंय.
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी ही भेट असू शकते.
राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाढलेली राजकीय जवळीक पाहता ही युती नक्की शिवसेनेसाठी अडचण ठरणार आहे
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या तिघांची युती होईल आणि याचा थेट परिणाम शिवसेनेच्या मतांवर होईल अशा पद्धतीची चर्चा राजकीय वर्तुळात आहे

राज्यांत शिंदे-फडणवीस सरकारं आलं आणि आता मनसे सोबतच्या युतीच्या चर्चा चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे.