जेव्हा तिचा पती प्रेयसी सोबत शारीरीक संबंध ठेवायचा, तेव्हा तो पत्नीला व्हिडिओ कॉल करून दाखवायचा

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात ही घटना घडली होती. या घटनेत पत्नीला या खुन्य़ात तिच्या मुलीनेही साथ दिली होती. मात्र या प्रकरणात पोलिसांनी मृताच्या पत्नीला अटक केली आहे. दरम्यान या घटनेने कुटूंबियांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला.

गाझियाबाद : गेल्या अनेक वर्षापासून एकस्ट्रा मेरीटल अफेअरच्या (Extramarital affair) घटना वाढल्या आहेत. या घटनांमुळे देशभरात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

अशीच एक घटना आता समोर आली आहे. या घटनेत पती प्रेयसीसोबत शारीरीक संबंध (Extramarital sex) ठेवताना पत्नीला व्हिडिओ कॉल (Video Call) करायचा. एक लग्न झालेली महिला आपल्या पतीला दुसऱ्या महिलेच्या कुशीत पाहुन नेहमीच संतापायची. पतीच्या या कृतीने पत्नी नेहमीच रागवायची. मात्र सततच्या या संतापाला कंटाळत आता पत्नीने टोकाचे पाऊल उचलंल आहे.

पोलिसांनी (Police enquiry) दिलेल्या मााहितीनुसार, मधुवन बापुधाम पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस गस्त घालत होते. या दरम्यान त्यांना रविवारी पहाटे रस्त्याच्या कडेला एक कार उभी असलेली दिसली. पोलिसांनी गाडीत डोकावले असता, एक माणूस रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडला होता. पोलिसांनी गाडीचा दरवाजा उघडून तपासले असता तो मृतावस्थेत होता. दरम्यान पोलिसांनी बॉडी ताब्यात घेत तपास सुरु केला. या तपासाअंती मृतदेहाची ओळख पटली. अमित वर्मा (40 वर्षे) असं मृत व्यक्तीचं नाव असून तो संजय नगर, सेक्टर-२३ एम-ब्लॉक मध्ये राहायचा.

असे उलगडले खुनासे रहस्य
पोलिसांनी (Police enquiry) या प्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे. यासाठी त्यांनी सर्वप्रथम पत्नीची चौकशी करण्यास सुरुवात केली. पत्नीची चौकशी करताना पोलिसांना संशय आला. मात्र पोलिसांनी कठोर चौकशी (Inquiry) केली असता तिने संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली.

पत्नीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिच्या पतीचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध (Extramarital affair) होते. यावरून घरात रोज वाद व्हायचे. इतकेच नाही तर पत्नीचा असाही आरोप आहे की, जेव्हा तिचा पती प्रेयसी सोबत शारीरीक संबंध (Extramarital sex) ठेवायचा, तेव्हा तो पत्नीला व्हिडिओ कॉल (Video Call) करून दाखवायचा,अशी धक्कादायक माहिती तिने दिली.

पत्नी पुढे म्हणाली की, शनिवारी रात्रीही याच गोष्टीवरून घरात वाद झाला होता. नवऱ्याच्या रोजच्या भांडणामुळे आणि कुरबुरीला कंटाळून महिलेने त्याच्या डोक्यात जड वस्तूने वार केले. यामुळे त्याचा मृत्यू झाला. यानंतर महिलेने मृतदेह कारमध्ये टाकून निर्जनस्थळी सोडले. तसेच खूनाचे पुरावे पुसण्यासाठी रक्ताने माखलेले कपडेही रात्री धुऊन वाळवले होते. घरात पडलेले रक्तही रात्रीच्या रात्री स्वच्छ केल्याची तिने पोलिसांसमोर कबुली दिली.