मी तुमच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करु इच्छिते तुम्ही लवकर या हनी ट्रॅप 5 आरोपीसह महिलेला ताब्यात

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


हनी ट्रॅपचे प्रकार वाढत चालले आहेत
वेगवेगळ्या माध्यमातून हनी ट्रॅप करत पैशांची मागणी करण्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्यातून (Buldhana News Updates) समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील एका गावातील माजी सरपंचाला हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचा प्रकार समोर आला आहे. या माजी सरपंचाला एका महिलेने फोन करून एका निर्जन स्थळी बोलावून घेतलं. यानंतर त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या इतर पाच जणांना सरपंचाला मारहाण केली. शिवाय आम्ही तुझे आता व्हिडीओ काढले असून ते समाज माध्यमात व्हायरल करु असं सांगत आताच एक लाख रुपये दे, असा दम दिला. सोबतच यावेळी सरपंचाच्या जवळील पाच हजार रुपये घेतले आणि पळून गेले.

या घटनेनंतर सरपंचाने बुलढाणा शहर पोलीसात तक्रार दाखल केली. सरपंचाने दिलेल्या तक्रारीवरून काही तासातच पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून त्यात एका महिलेचा समावेश आहे. विशेष म्हणजे अलीकडे बुलढाणा परिसरात असे प्रकार वाढले असून या प्रकाराला बळी न पडण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील एका गावच्या माजी सरपंचाने ही तक्रार शहर पोलीस ठाण्यात केली आहे. तक्रारीत म्हटलं आहे की, त्यांना एका महिलेने फोन द्वारे सांगितले की, मी तुमच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करु इच्छिते तुम्ही लवकर या. मग काय माजी सरपंचांनी तात्काळ सांगितलेल्या ठिकाणी म्हणजेच शहरातील निर्जन अशा डी एड कॉलेज परिसर गाठला. एका टीन शेडमध्ये त्यांना बोलावण्यात आले. सदर महिला यावेळी निर्वस्त्र झाली. हे पाहून माजी सरपंचांनी देखील तयारी केली. आणि नंतर खरा खेळ सुरू झाला. तिथे दडून बसलेल्या चार ते पाच युवकांनी या दोघांना तिथेच घेरले.

त्यांनी माजी सरपंचांना म्हटलं की, आम्ही तुमचे व्हिडिओ काढलेले आहेत. तुम्ही जर आम्हाला एक लाख रुपये दिले नाहीत तर हे व्हिडीओ आम्ही सोशल मीडियावर व्हायरल करू. तसेच त्यांच्या जवळ असलेले नगदी साडे पाच हजार रुपये काढून घेतले. त्यांना मारहाण करून तिथून पळून गेले. पोलिसांच्या डीपी पथकातील टीमने अवघ्या काही तासातच या 5 आरोपीसह 23 वर्षीय सदर महिलेला ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी कृष्णा पवार , अजय वीरशीद, रुपेश सोनवणे, संतोष जाधव यांच्यासह एक 17 वर्षीय युवक आणि 23 वर्षीय महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.