बनावट प्रमाणपत्र सादर करुण बँकेकडून पेन्शन हडप

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पुणे : पतीच्या मृत्यूनंतर देखील ते जिवंत असल्याचे प्रमाणपत्र सादर करून पेन्शन घेणार्‍या 58 वर्षीय पत्नीच्या विरुद्ध चतुःश्रृंगी पोलिसांनी फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
विशेष म्हणजे पत्नीचे निधन झाल्यानंतर आता दीड वर्षाने हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कॉलेज ऑफ अ‍ॅग्रीकल्चर बँकिंगचे सहायक महाव्यवस्थापक अंजली कार्येकर यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 14 जून 2018 ते 5 जानेवारी 2021 दरम्यान घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, के. पी. पद्मनाभन हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येथे कर्मचारी होते. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना निवृत्तवेतन मिळत होते. त्यांचे 14 जून 2018 रोजी निधन झाले. त्यानंतरही त्यांच्या पत्नीने बँकेला के. पी. पद्मनाभन हे जिवंत असल्याचे प्रमाणपत्र सादर केले. त्यामुळे बँकेकडून त्यांना पेन्शन दिली जात होती. दरम्यान, 21 डिसेंबर 2020 रोजी त्यांच्या पत्नीचेही निधन झाले. त्यानंतरही जानेवारी 2021 पर्यंत पेन्शन सुरू होती. त्यानंतर आता हा प्रकार उघडकीस आला आहे. हे बनावट प्रमाणपत्र कोणी सादर केले, त्याचा नेमका लाभ कोणाला झाला, याचा तपास पोलिस निरीक्षक चिंतामण करीत आहेत.