क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

प्रेमात अडथळा ठरत असल्याने मुलाची हत्या


सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अल्पवयीन मुलगी घराजवळील रस्त्यालगतच्या नाल्यात निष्पाप मुलाला फेकून देताना स्पष्ट दिसत आहे. पोलिसांनी गुरुवारी सकाळी मुलाची आई आफशा हिला अटक केली असता तिने हत्येची कबुली दिली.उत्तर प्रदेश : प्रेम प्रकरणात अडथळा ठरणाऱ्या सहा महिन्यांच्या मुलाची आईनेच हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये घडली आहे.
मुलाची हत्या केल्यानंतर आरोपी आईने अपहरणा (Kidnapping)चा बनाव केला. पोलिसांनी या नराधम मातेला बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे बालकाच्या हत्येचे रहस्य उलगडण्यास पोलिसांना यश आले. अफशा असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपी आईचे नाव आहे. महिलेचा पती नोकरीनिमित्त परदेशात असतो.
अफशाचा दोन वर्षापूर्वी आसिफ नावाच्या व्यक्तीशी विवाह झाला होता. दोघांना एक सहा महिन्यांचा मुलगाही आहे. काही महिन्यांपूर्वी आसिफ नोकरीसाठी परदेशात गेला. अफशाचे दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध सुरु होते. या प्रेमसंबंधात मुलगा अडथळा ठरत होता.

यानंतर महिलेनेच आपल्या मुलाच्या अपहरणाचे खोटे नाटक रचले. पोलीस आणि परिसरातील नागरिक रात्रभर जंगलात शोध घेत होते. मात्र याच दरम्यान पोलिसांची नजर रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर गेली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात करताच अपहरण नाट्याचा पर्दाफाश झाला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button