शिनजियांगमध्ये उइगर मुस्लिमांना ओलीस ठेवून त्यांच्यावर अत्याचार

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


हिंदुस्थानविरोधात वारंवार कुरापती करूनही जगापुढे शांततेचा दिखावा करणाऱया चीनचा बुरखा संयुक्त राष्ट्राने फाडला आहे. चीनच्या शीनजियांग प्रांतात उइगर मुस्लिमांना मागील अनेक वर्षांपासून प्रचंड छळले जात आहे.
बिजींग : चीनमधील शिनजियांग प्रांतात (Xiajiang Province) उइगर (Uyghur Muslims) मुस्लीमांसह इतर अल्पसंख्यांकांचा छळ केला जात आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या (UNO) मानवाधिकार आयोगाने (Human Rights Commission) सादर केलेल्या अहवालात सदर माहिती समोर आली आहे. शिनजियांग प्रांतात लोकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

उइगर वंशाच्या लोकांना ओलीस ठेवून त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत आणि या लोकांच्या अवयवांची जबरदस्तीने विक्री देली जात असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार आयोगाने सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे. शिनजियांगमध्ये उइगर मुस्लिमांना ओलीस ठेवून त्यांच्यावर अत्याचार केले जातात. या लोकांचे अवयव काढून काळ्या बाजारात विकले जात असून लैंगिक अत्याचारदेखील (Sexual Torture) होत आहेत, असे अहवालात म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांचा हा अहवाल फार पूर्वी प्रसिद्ध होणार होता. मात्र, चीनचा त्याला विरोध आहे. हा अहवाल प्रसिद्ध व्हावा असे चीनला वाटत नव्हते. परंतु, संयुक्त राष्ट्राने नुकताच हा अहवाल प्रसिद्ध केला. चीनची प्रतिमा मलिन करण्यासाठी हा अहवाल तयार करण्यात आला आहे, असे चीनने या अहवालावर सांगितले.

चीनवर उइगर लोकांवर अत्याचार करत असल्याचा आरोप पाश्चात्य देशांकडून यापूर्वीही झाला आहे. चीनच्या व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र व मानसोपचार रुग्णालयांमध्ये केल्या जाणाऱ्या उपचारांबाबत या अहवालात प्रश्न उपस्थित केला आहेत. राजकीय कैद्यांना मनोरुग्णालयात शिक्षा देत असल्याचा दावा एका मानवाधिकार गटाने केला आहे. या कैद्यांना विजेचे चटके दिले जात आहेत, शिवाय त्यांना बंद खोलीत कोंडले जाते. अल्पसंख्याक समुदायातील लोकांना अटक करून त्यांना जबरदस्तीने औषधे दिली जातात. धक्कादायक बाब म्हणजे या लोकांचे जबरदस्तीने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचे अहवालात म्हटले आहे.