ताज्या बातम्यादेश-विदेशपुणेमहत्वाचेमहाराष्ट्र

पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न,हवेतील बस सेवा सुरु करण्याची घोषणा


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या नवनवीन कल्पना नेहमीच मांडत असतात. पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी गडकरींनी आता पुण्यात हवेतील बस सेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे.
पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑन इलेक्ट्रिसिटी ज्यामधे रोपवे, केबल कार व्हर्नाक्युलर रेल्वेचा समावेश होतो. याची जबाबदारी आपल्याकडे सोपवावी अशी सुचना गडकरींकडून चंद्रकांत पाटील यांना करण्यात आली.



महाराष्ट्रात आपण 165 रोप वे केबल कार उभारणार असल्याच गडकरींनी जाहीर केलं आहे. त्यामधे एकावेळेस 150 जण प्रवास करु शकणार आहेत. पुण्यातील वाहतूक कोंडी पाहता त्यावर निश्चित तोडगा काढणं गरजेचं आहे. त्यासाठी जगात अनेक पर्याय उपलब्ध आहेत.त्यात आपल्याकडे हवेतून चालणाऱ्या बसचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे, असं गडकरी म्हणाले.

पुण्याच्या लोकप्रतिनिधींना या संदर्भात कल्पना दिली आहे. पुण्यात सगळं साकारायचं असेल तर त्यांचा यात सहभाग महत्वाचा आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर मी सर्वात आधी हा प्रस्ताव ठेवला आहे. यासाठी निधी देण्यासाठीसुद्धा आम्ही तयार आहोत. मात्र त्या पद्धतीचं नियोजन आणि आराखडा व्हायला हवा असंदेखील ते म्हणाले. याशिवाय दोन बस एकमेकांना जोडल्या जातात अशा ट्रॉली बसचा पर्यायही आपल्याकडे उपलब्ध असल्याच त्यांनी म्हटलय. हवेतील बसमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न बर्‍यापैकी सुटु शकतो असं गडकरी म्हणालेत. त्याचबरोबर सातारा रोडवर एलिव्हेटेड रोड बांधण्याची योजना आहे. म्हणजे खाली रस्ता, त्यावर दोन उड्डाणपूल आणि त्याच्यावर मेट्रो-वगैरे सारखी मास रॅपिड ट्रान्सपोर्टची व्यवस्था असेल. त्यासंदर्भात अभ्यास करायला मी सांगितलं आहे

रोप ववे केबल कार म्हणजे काय?
एका खांबावर दोन्ही बाजूंनी प्रवास करण्यासाठी केबल कार तारांमधून चालवल्या जातात. स्थानकावर पोहोचल्यावर ते तारांपासून वेगळे होते आणि प्रवाशांना खाली उतरवते आणि पुन्हा ताऱ्यांशी जोडून ​​ते त्यांच्या पुढील प्रवास करते. अशीच कल्पना नितीन गडकरी आणणार आहेत. 165 रोप वे केबल कार उभारणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. त्यांनी जाहीर केलेली केबल कार सिस्टीम सध्या टास्मानिया, जेरुसलेम, शिकागो आणि मोंबासा येथे सुरु आहेत. ही केबल कार हृदयाचा त्रास किंवा घाबरणाऱ्या व्यक्तींसाठी धोकादायक आहे. यामध्ये केबल कारचा मजला काचेचा बनवला आहे. तो आरपार दिसतो. उंचीवर बसणे आणि खाली पाहणे भितीदायक असू शकते मात्र नीतीन गडकरी यांची केबल कारची कल्पना नेमकी कशी असणार आहे, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button